मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 03:42 PM2020-08-01T15:42:34+5:302020-08-01T15:49:27+5:30
सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. देशात कलर TV आयात करण्यास बंदी घातली आहे.
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता चीनला आणखी एक मोठा दणका दिला आहे. देशात कलर TV आयात करण्यास बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने कलर टीव्हीच्या आयातीवर बंदी घातली. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एका अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. कलर टीव्हीसाठी आता DGFT कडून आयात करण्याचं वेगळं लायसन्स घ्यावं लागणार आहे. या लायसन्स नंतर चीनकडून आयात झालेले टीव्ही खरेदी करता येणार आहेत. चीनसह व्हिएतनाम, मलेशिया, हाँगकाँग, कोरिया आणि इंडोनेशिया या देशांचाही यामध्ये समावेश आहे. या देशांमधून कलर टीव्ही आयात केला जातो.
Government puts restrictions on imports of colour television sets: DGFT notification
— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2020
केंद्र सरकारने 36 सेमी ते 105 सेमी आकाराच्या टीव्ही स्क्रीनसाठी हे निर्बंध घातले आहेत. तसेच 63 सेमी पेक्षा कमी स्क्रीन आकाराच्या लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एलसीडी) टीव्ही सेटवर देखील हा निर्बंध लागू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी भारतात 428 मिलियन डॉलर टीव्हीची आयात करण्यात आली. पॅनासोनिक इंडिया (Panasonic India) चे सीईओ व अध्यक्ष मनीष शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता ग्राहकांना उच्च क्वालिटीचे असेम्बल्ड टीव्ही सेट्स मिळणार आहेत. तसेच काही प्रमुख ब्रॅड्सने आधीपासून भारतात आपलं मॅन्युफॅक्चरिंग यूनिट्स ओपन केल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
TikTok चीनशी संबंध तोडणार अन्...https://t.co/QAkHakfPCZ#tiktokban#TikTok#technology
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2020
ऐकावं ते नवलंच! राखी न बांधण्यामागे 'हे' आहे कारण, वाचून व्हाल हैराण https://t.co/3vgmhdDPqh#RakshaBandhan
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
TikTok चे अच्छे दिन संपले? लवकरच होणार व्हिडिओ शेअरिंग अॅपचा लिलाव
काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी
Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"
CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत 57,117 नवे रुग्ण, 16 लाखांचा टप्पा केला पार
खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल