अॅल्युमिनियम फॉईल डंपिंगप्रकरणी भारताकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 02:29 AM2020-06-24T02:29:20+5:302020-06-24T02:29:27+5:30
चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांतून अॅल्युमिनियम फॉईलची मोठ्या प्रमाणात स्वस्त आयात होत असल्याची तक्रार देशांतर्गत उत्पादकांकडून केली जात होती.
नवी दिल्ली : चार देशांतून होणाऱ्या अॅल्युमिनियम फॉईलच्या स्वस्त आयात (डम्पिंग) प्रकरणाची भारताने चौकशी सुरू केली आहे.
चीन, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड या देशांतून अॅल्युमिनियम फॉईलची मोठ्या प्रमाणात स्वस्त आयात होत असल्याची तक्रार देशांतर्गत उत्पादकांकडून केली जात होती. हिंदाल्को इंडस्ट्रीज, रविराज फॉईल्स आणि जिंदाल इंडिया कंपन्यांनी वाणिज्य मंत्रालयांतर्गत काम करणाºया व्यापार उपाय महासंचालनालयाकडे रीतसर अर्ज सादर करून चौकशीची मागणी केली होती. ८0 मायक्रॉन आणि त्यापेक्षा कमी जाडीच्या अॅल्युमिनियम फॉईलची प्रचंड आयात या देशांतून होत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. या कंपन्यांनी प्राथमिक पुरावाही महासंचालनालयाकडे सादर केला होता. आता महासंचालनालयाने चौकशीचा निर्णय घेतला आहे. अर्जदारांनी सादर केलेल्या पुराव्यात प्रथमदर्शनी तथ्य दिसून येते, असे महासंचालनालयाने म्हटले आहे.