'भारत इंटरेस्टींगय... 1 कप कॉफीसाठी 250 ₹ अन् 2 इडल्या फक्त 3.50 रुपये'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 09:41 PM2021-09-01T21:41:52+5:302021-09-01T21:42:14+5:30
देशात सध्या नवीन जनरेशनप्रमाणे ट्रेंड सेट होत आहेत. सीसीडीसारखे कॅफे शॉप उघडले जात आहेत. मॉलमध्ये पिझ्झा बर्गर खाणाऱ्यांची संख्या वाढलीय. महागड्या स्वरुपात हे स्नॅक्स फूड चवीनं खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
भारत - विविधतेनं नटलेला देश म्हणजे भारत, विविध धर्म, जाती पंथ आणि संस्कृतीचा एकत्र देश म्हणजे भारत. म्हणून, विविधतेनं नटलेला देश म्हणून, सर्वधर्मीयांचा देश म्हणून भारताची जगभर ख्याती आहे. देशात दर 30 किमीवर भाषेत झालेला बदल दिसून येतो. तर, प्रांतवार रचनेमुळे विविध प्रातांच्या विविध भाषाही येथील आकर्षण ठरतं. संस्कृती, खान-पान आणि पोशाख हेही येथील विशेषत: ठरते. उद्योजक हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या फोटोवरुन हेही लक्षात येईल.
देशात सध्या नवीन जनरेशनप्रमाणे ट्रेंड सेट होत आहेत. सीसीडीसारखे कॅफे शॉप उघडले जात आहेत. मॉलमध्ये पिझ्झा बर्गर खाणाऱ्यांची संख्या वाढलीय. महागड्या स्वरुपात हे स्नॅक्स फूड चवीनं खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर, दुसरीकडे स्ट्रीट फूड खाणारेही आहेत, पोटाची भूक भागविण्यासाठी स्वस्तात मस्त हात गाड्यावरील फूडचीही चव चाखणारे आहेत. या दोन्ही संस्कृतीत मोठा फरक आहेत. शहरात तुम्हाला दोन्ही संस्कृती पाहायला मिळतील. पण, ग्रामीण भागात केवळ हातगाडीवरीलच संस्कृती पाहायला मिळेल. उद्योजक हर्ष गोएंका यांनी ट्विट करुन काही फोटो शेअर केले आहेत. त्यात, या शहरी आणि ग्रामीण भागातील दुनियादारी, किंमती, महागाई यांचं वर्णन केलंय.
There is an ‘Idli Market’ in Erode, Tamil Nadu where they sell 20000 idlis daily. Two idlis here cost Rs 3.50 and if you include sambar/chutney then it costs Rs 6.50.
— Harsh Goenka (@hvgoenka) September 1, 2021
India is an interesting country where a cup of Starbucks coffee costs Rs 250 and two yummy idlis cost Rs3.50! pic.twitter.com/UjRNRwJkLg
तामिळनाडूच्या इरोड येथील इडली मार्केटचे हे फोटो आहेत. येथे दररोज 20 हजार इडल्या विकल्या जातात. येथील 2 इडल्यांची किंमत 3.5 रुपये असून तुम्ही सांबर/चटनी घेतल्यास ती किंमत 6.50 रुपये द्यावे लागतात. भारत हा इंटरेस्टींग देश आहे. जेथे एका कॉफीच्या कपासाठी 250 रुपये मोजावे लागतात, तेथेच दोन यमी इडल्या फक्त 3.50 रुपयांत मिळतात, असे ट्विट गोएंका यांनी केले आहे.
गोएंका यांनी या इडली मार्केटचे, येथील गर्दीचे आणि येथील किंमतीचे आश्चर्य वाटले आहे. म्हणूनच त्यांनी येथील मार्केटचे, विक्रेत्यांचे फोटो शेअर करत कौतुक केलंय.