भारतात या, गुंतवणूक करा!
By admin | Published: September 30, 2014 01:09 AM2014-09-30T01:09:22+5:302014-09-30T01:09:22+5:30
देशातील उद्योजक क्षेत्र आपण स्वच्छ करु असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील प्रमुख कार्पोरेट प्रमुखांना दिले व भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले.
Next
>मोदींचे आवाहन : सीईओंसमवेत चर्चा, उद्योग क्षेत्र स्वच्छ करणर
न्यूयॉर्क : भारतातील कोळसा खाणपट्टेवाटपासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ही एक संधी असून, तिचा फायदा घेऊन देशातील उद्योजक क्षेत्र आपण स्वच्छ करु असे आश्वासन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील प्रमुख कार्पोरेट प्रमुखांना दिले व भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले.
अमेरिकेतील 15 प्रमुख उद्योजकांसाठी मोदी यांनी ब्रेकफास्ट मीटींग आयोजित केली होती. पेप्सिकोच्या मूळ भारतीय वंशाच्या सीईओ इंद्रा नूयी , गुगलचे अध्यक्ष एरिक श्मिड्ट व सीटी ग्रूपचे प्रमुख मायकेल कोर्बट हे या ब्रेकफास्ट बैठकीस उपस्थित होते. सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवडय़ात दिलेल्या निकालानुसार 1993पासून विविध कंपन्याना दिलेल्या 218 कोळसा खाणींपैकी 214 खाणींचे वाटप रद्द केले आहे. यापैकी 42 कंपन्या सरकारने हाती घ्याव्यात असेही या निकालात म्हटले आहे. हा निकाल व्यापारी क्षेत्रसाठी धोकादायक ठरेल अशी काळजी व्यक्त केली जात असताना मोदी यांनी निकालाचा असा वेगळा अर्थ लावला आहे.
मोदी यांनी आपल्या चिंता व्यवस्थित ऐकून घेतल्या, भारतात कोणत्या क्षेत्रत प्रामुख्याने गुंतवणूक करता येईल हे सांगितले, ही बैठक चांगली व मोकळ्या वातावरणात झाली, असे इंद्रा नूयी व कॉर्बट यांनी म्हटले. भारताला पुढे नेण्यास मोदी प्रय} करीत आहेत असे त्यानी सांगितले.
भारत खुल्या मनाचा आहे, आम्हाला बदल हवा आहे , आणि बदल एका बाजूने होत नाही, असे मोदी म्हणाले.
मोदी-ओबामा यांची आज भेट
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट मंगळवारी होणार आहे. या बैठकीत दोन्ही नेते परस्पर हिताच्या विषयांवर चर्चा करतील, त्यात आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी काय उपाय योजता येतील यावर प्रामुख्याने चर्चा होईल.
सुरक्षा सहकार्य व अमेरिका- भारत यांच्यातील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावरही या बैठकीत चर्चा होईल. जगभरातील ताज्या घडामोडी आणि भारत-पाकिस्तान संबंधातील अमेरिकेची भूमिका या अनुषंगाने या भेटीविषयीचे कुतूहल वाढले आहे.
अफगाणिस्तान , सिरीया व इराकमधील सद्यस्थिती , तिथे भारत व अमेरिका यांना एकत्र येऊन करण्यासारखे काम यावरही या बैठकीत चर्चा होईल असे व्हाईट हाऊसतर्फे यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बैठकीआधी अध्यक्ष ओबामा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी सोमवारी रात्री व्हाईट हाऊसमध्ये खाजगी मेजवानीचे आयोजन केले आहे. व्हाईट हाऊसच्या ब्लू रुममध्ये आयोजित या मेजवानीस निवडक निमंत्रित उपस्थित असतील.या मेजवानीस अमेरिकेचे उपाध्यक्ष जो बायडेन, परराष्ट्र मंत्री जॉन केरी, सुरक्षा सल्लागार सुसान राईस हे उपस्थित असतील.
व्हाईट हाऊससमोर
होणार रासदांडीया
व्हाईट हाऊसमध्ये मंगळवारी जाण्याआधी मोदी लिंकन मेमोरियल, मार्टिन ल्युथर किंग (ज्यु.) मेमोरियलला भेट देतील व भारतीय दूतावासासमोर उभारलेल्या महात्मा गांधीजींच्या यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतील. तेथे अमेरिकेतील भारतीय नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतील असे अपेक्षित आहे. भारतीय नागरिक मंगळवारी व्हाईट हाऊससमोर दांडिया रास व गरबा नृत्याचे कार्यक्रम सादर करणार आहेत.