भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 01:24 PM2023-10-22T13:24:28+5:302023-10-22T13:26:44+5:30

हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे. 

India is a country of Hindus, Muslims are also the safest here Mohan Bhagwat's statement on Israel-Hamas war | भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

भारत हिंदूंचा देश, येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित; इस्रायल-हमास युद्धावरून मोहन भागवत यांचं वक्तव्य

 इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. हिंदू धर्म सर्वच संप्रदायांचा आदर करतो. भारतात कधीही अशा मुद्द्यांवरून भांडणं झाली नाहीत, ज्यांवरून आज हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे. 

पीटीआयनुसार, छत्रपति शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, या देशात एक धर्म, संस्कृती अशी आहे, जी सर्व सांप्रदायांचा आणि आस्थांचा आदर करते. ती संस्कृती म्हणजे हिंदू धर्म. हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ आम्ही इतर धर्म स्वीकारत नाही असा नाही.

'असे केवळ भारतच करू शकतो...'
भागवत म्हणाले, आपण जेव्हा हिंदू म्हणता, तेव्हा मुस्लिमांनाही सुरक्षा देण्यात आली आहे, हे सांगण्याची गरज पडत नाही. केवळ हिंदूच असे करतात. केवळ भारतच असे करतो. दुसऱ्या देशांमध्ये असे होत नाही. सर्वत्र संघर्ष होत आहेत. आपण यूक्रेन युद्ध आणइ हमास-इस्राइल युद्धासंदर्भात तर ऐकलेच असेल. आपल्या देशात अशा मुद्द्यांवरून कधीच युद्ध झाले नाही. शिवाजी महाराजांच्या काळात झालेले आक्रमण त्याच प्रकारचे होते. मात्र आम्ही या मुद्द्यावर कभीही कुणासोबतही लढलो नाही. यामुळेच आपण हिंदू आहोत, असेही भागवत म्हणाले.
 

Web Title: India is a country of Hindus, Muslims are also the safest here Mohan Bhagwat's statement on Israel-Hamas war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.