तरुणांसाठी भारत हे ‘पॉवर हाऊस’; देशाच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करताना विकसित भारताचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:29 PM2024-01-11T14:29:32+5:302024-01-11T14:30:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास; विश्वाचा मित्र म्हणून देश पुढे येत आहे!

India is a 'power house' for youth; Confidence of Prime Minister Narendra Modi | तरुणांसाठी भारत हे ‘पॉवर हाऊस’; देशाच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करताना विकसित भारताचा निर्धार

तरुणांसाठी भारत हे ‘पॉवर हाऊस’; देशाच्या स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करताना विकसित भारताचा निर्धार

गांधीनगर : जागतिक स्थैर्यासाठी भारत हा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, जागतिक अर्थव्यवस्थेला गती देणारे एक इंजिन आहे, प्रतिभावान तरुणपिढीसाठी मोठे ‘पॉवरहाऊस’ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी १० व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केले. महात्मा मंदिर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटरमध्ये परिषदेचे भरविली होती.

पंतप्रधान म्हणाले की, जगातील सर्व रेटिंग्ज एजन्सींना विश्वास वाटतो की येत्या काही वर्षांत भारताचा समावेश जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये होईल. भारत म्हणजे ग्लोबल साऊथचा आवाज आहे. जगभरात सर्वत्र अनिश्चितता असताना भारत एक आशेचा किरण बनून पुढे येत आहे. भारताने जगाला विश्वास दिला आहे की, आम्ही सर्वांच्या भल्यासाठी लक्ष्य निर्धारित करतो आणि ते पूर्ण करूनही दाखवतो. एकेकाळी जगात ११ व्या क्रमांकावर असलेली भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या स्थानी पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)

यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेटर फियाला, मोझांबिकचे राष्ट्रपती फिलिप जॅसिंटो न्युसी, तिमोर-लेस्टेचे अध्यक्ष जोस रामोस होर्टा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि दिग्गज नेते यांच्यासह देशभरातील उद्योगपती या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विश्वाचा मित्र म्हणून देश पुढे येत आहे

जागतिक समीकरणे वेगाने बदलत असताना विश्वाचा मित्र म्हणून भूमिकेत भारत पुढे येत आहे. जगाच्या कल्याण साधताना भारताची निष्ठा, प्रयत्न आणि परिश्रमांमुळे भविष्य अधिक सुरक्षित आणि समृद्ध बनत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना भारताला विकसित देश बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. पुढील २५ वर्षे देशासाठी अमृतकाळ ठरणार आहेत.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गुजरातमध्ये किती गुंतवणूक येणार?

  • उद्योगपती गौतम अदानी यांनी अदानी समूहाकडून पाच वर्षांत २४ अब्ज रुपयांची गु्ंतवणूक करण्याची घोषणा केली. ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये समूह १० वर्षांत १०० अब्ज रुपये गुंतवणार आहे.
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पहिला कार्बन फायबर फॅसिलिटी प्रकल्प हजिरा येथे सुरू करण्याची घोषणा केली. 
  • टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी धोलेरामध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. २० जिगाव्हॅट क्षमतेचा लिथियम आयन स्टोअरेज बॅटरी फॅक्टरी दोन महिन्यात सुरू करण्याची घोषणा केली.
  • सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी ३५ हजार कोटी गुंतवणूक करून दुसरा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली.
  • आर्सेलर-मित्तल कंपनीचे चेअरमन लक्ष्मी मित्तल यांनी जगातील सर्वांत मोठा स्टील प्रकल्प हजिरा येथे २०२९ पर्यंत सुरू करण्याची घोषणा केली. यातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. 
  • नेदरलँड आणि सिंगापूर येथील कंपन्यांनी या आर्थिक वर्षात ७ अब्ज रुपये गुंतवण्याची घोषणा केली.


नरेंद्र मोदी सर्वांत यशस्वी पंतप्रधान

नरेंद्र मोदी हे देशातील सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान आहेत. रिलायन्स ही एक गुजराथी कंपनी होती आणि नेहमीच राहील. १० वर्षांत रिलायन्सने १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यातील एकतृतीयांश गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये करण्यात आली. गुजरात २०४७ पर्यंत ३ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, तसेच भारत ३५ हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनेल.
-मुकेश अंबानी, चेअरमन, रिलायन्स इंडस्ट्रीज

Web Title: India is a 'power house' for youth; Confidence of Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.