भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही पुढे गेली; संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने जाहीर केली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 02:18 PM2023-04-19T14:18:10+5:302023-04-19T14:21:22+5:30

युएनएफपीएने 'द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023' रिपोर्ट प्रकाशित केला आहे. याचे शीर्षक 8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस असे आहे.

India is now world’s most populous country, beat china, suggests UN data | भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही पुढे गेली; संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने जाहीर केली आकडेवारी

भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही पुढे गेली; संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने जाहीर केली आकडेवारी

googlenewsNext

भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धा साऱ्यांनाच माहिती आहे. परंतू, एका नकोशा गोष्टीमध्ये भारतानेचीनला मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 2.9 दशलक्षांनी जास्त झाली आहे. यामुळे भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे.

युएनएफपीएने 'द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, 2023' रिपोर्ट प्रकाशित केला आहे. याचे शीर्षक 8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस असे आहे. हा रिपोर्ट युएनने आजच जाहीर केला आहे. अहवालातील ताजी आकडेवारी 'डेमोग्राफिक इंडिकेटर्स' या श्रेणीमध्ये देण्यात आली आहे.

संस्था १९५० पासून जगातील लोकसंख्येची माहिती गोळा करत आहे. एवढ्या वर्षांत पहिल्यांदाच चीनला भारताने मागे टाकले आहे. भारताने चीनला कधी मागे टाकले हे सांगता येत नसल्याचे, युएनएफपीएच्या माध्यम सल्लागार एन्ना  जेफरीज यांनी म्हटले आहे.  भारताची लोकसंख्या 142.86 कोटी आहे तर चीनची 1,42.57 कोटी आहे.

दोन्ही देशांची तुलना करणे कठीण आहे. कारण दोन्ही देशांच्या माहिती गोळा करण्यात थोडेसे अंतर आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर होती, परंतू ती यंदा कमी होऊ लागली आहे. दुसरीकडे भारताची लोकसंख्या वाढत चालली आहे. असे असले तरी १९८० पेक्षा वाढीचा वेग कमी आहे. म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दर पूर्वीपेक्षा कमी आहे. हाच कायतो दिलासा म्हणावा लागणार आहे. 

युवांची संख्या किती...
भारत हा युवांचा देश म्हटला जात आहे. ० ते १४ वर्षे वयोगटाचा एकूण लोकसंख्येतील वाटा २५ टक्के आहे. 10 ते 19 वयोगटातील 18 टक्के, 10 ते 24 वयोगटातील लोकांची संख्या 26 टक्के आहे. 15 ते 64 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या 68 टक्के आहे. तर 65 वर्षे वयावरील लोकांचा लोकसंख्येतील वाटा हा 7 टक्के आहे. 
याउलट चीनचे आहे. चीनमध्ये 65 वर्षे वयावरील लोकांचा लोकसंख्येतील वाटा हा १४ टक्के आहे. 0 ते 14 वर्षे वयोगटाचा 17%, 10 ते 19 वयोगटाचा 12% , 10 ते 24 वर्षे वयोगटाचा 18%, 15 ते 64 वर्षे वयोगटाचा 69% वाटा आहे.

Web Title: India is now world’s most populous country, beat china, suggests UN data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.