तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था, मोठी स्वप्ने पाहा : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:26 AM2023-07-27T10:26:04+5:302023-07-27T10:26:31+5:30

या केंद्राला मोदी यांनी ‘भारत मंडपम’ असे नाव दिले आहे. यावेळी त्यांनी भारत करत असलेल्या प्रगतीचे अनेक दाखलेही दिले.

India is the third largest economy in the world in the third term | तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था, मोठी स्वप्ने पाहा : पंतप्रधान

तिसऱ्या टर्ममध्ये भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था, मोठी स्वप्ने पाहा : पंतप्रधान

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाच्या विकासाला आणखी वेग येईल, भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त करीत पंतप्रधान मोदी यांनी मोठा विचार करा, मोठी स्वप्ने पाहा आणि मोठी कामे करा, असा संदेश बुधवारी दिला.

प्रगती मैदान येथे देशातील सर्वांत मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलाच्या (आयईसीसी) उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. या केंद्राला मोदी यांनी ‘भारत मंडपम’ असे नाव दिले आहे. यावेळी त्यांनी भारत करत असलेल्या प्रगतीचे अनेक दाखलेही दिले.

युगे युगीन भारत असे सर्वांत मोठे संग्रहालय...

भारत मंडपम पर्यटन उपक्रमांना चालना देईल, असा विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी असा कोणताही भारतीय नसेल ज्याला नवीन संसद भवनाचा अभिमान वाटत नसेल, असे मत व्यक्त केले. 

nनकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, हे लोक विकासाशी संबंधित प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न करतात. ही टोळी भारत मंडपमचे महत्त्व खासगीत स्वीकारतील, ज्याप्रमाणे कर्तव्यपथाचा महिमा स्वीकारतात, असा चिमटाही मोदी यांनी काढला. नवी दिल्लीत लवकरच जगातील सर्वांत मोठे संग्रहालय ‘युगे युगीन भारत’ उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

पुढील २५ वर्षांत भारत  विकसित राष्ट्र

०५ कोटी प्रवाशांच्या तुलनेत दिल्ली विमानतळाची क्षमता ७.५ कोटी प्रवाशांनी वाढवली.
७० वरून देशातील विमानतळांची संख्या २०१४ पासून १५०वर पोहोचली आहे. 
०९ वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांवर ३४ लाख कोटी खर्च करण्यात आले, भारताला पुढील २५ वर्षांत विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: India is the third largest economy in the world in the third term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.