भारत-जपानमध्ये ऐतिहासिक अणू करार, NSG साठीही पाठिंबा
By admin | Published: November 11, 2016 05:57 PM2016-11-11T17:57:55+5:302016-11-11T20:17:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या उपस्थितीत नागरी अणू करारावर स्वाक्ष-या झाल्या.
Next
>ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. 11- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौ-यात मोठं यश मिळालं आहे. भारत आणि जपान दरम्यान ऐतिहासिक अणू करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्या उपस्थितीत नागरी अणू करारावर स्वाक्ष-या झाल्या. भारतासोबत अणूकरार करणारा जपान हा 11 वा देश आहे.
तसेच, जपानने अणू पुरवठादार गटात(NSG) भारताच्या कायम सदस्यत्वाचंही समर्थन केलं आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. अणुपुरवठादार देशांच्या समूहाची आज व्हिएन्नामध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. त्यामध्ये भारताच्या समावेशाबाबतचा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत आणि जपान हे नैसर्गिक मित्र आहेत, भारत -जपानच्या भागीदारीमुळे समाजात शांतता आणि समतोल राखण्यास मदत होईल असं मोदी म्हणाले. भारत आणि जपान दोघं मिळून दहशतवादाविरोधात लढण्यास तयार आहे असंही मोदी म्हणाले.
यापुर्वी गुरूवारी मोदींनी एका व्यापार सभेत 'मेक इन इंडिया, मेड बाय जापान' असा नारा दिला होता.