महासत्ता कोणीही असो! भारतच कोरोना लसीचा बादशाह; हा फोटो बरेच काही सांगतो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 11:44 AM2020-12-09T11:44:54+5:302020-12-09T11:45:26+5:30
CoronaVaccine News : भारतात तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. गुजरात, पुणे आणि हैदराबाद. तसेच फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लसींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत.
आज सकाळचा हा फोटो म्हणजे कोरोना लसीवर भारताच्या बादशाहीचा दर्शक आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणास जरी पहिल्यांदा सुरुवात झालेली असली तरीही जगभराच्या नजरा या भारताकडे लागलेल्या आहेत. कोरोनाच्या अंधारात भारत या देशांना आशेचा किरण दाखवत आहे. याचे एक मोठे कारण आहे. खरेतर कोरोना लसीची परडी ही भारताच्या हातात आहे. ही परडी हैदराबादमध्ये आहे. जगभरातील 64 देशांचे प्रतिनिधी आज या शहरात आहेत.
भारतात तीन ठिकाणी कोरोना लसी अंतिम टप्प्यात आहेत. गुजरात, पुणे आणि हैदराबाद. तसेच फायझर, सिरम आणि भारत बायोटेकने कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणासाठी अर्ज केले आहेत. या लसींमुळे आज जगाच्या नजरा भारताकडे आशेने पाहत आहेत. हे एक मोठे यश म्हणावे लागणार आहे. या लसीसाठी जगभरातील 64 देशांचे प्रतिनिधी हैदराबादमधील भारत बायोटेक व बायोलॉजिकल ई च्या दौऱ्यावर आहेत.
भारत बायोटेक स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनवर काम करत आहे. तर हैदराबादची आणखी एक कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड (बीई) ने जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी जॉन्सन फार्मास्युटिका एनव्हीसोबत करार केला आहे. या लसीचे उत्पादन भारतातही मोठ्या प्रमाणावर केले जाणार आहे.
Telangana: The 64 Heads of Missions in India arrive in Hyderabad.
— ANI (@ANI) December 9, 2020
They are scheduled to visit Bharat Biotech and Biological E. Ltd, in continuation of the briefing by Ministry of External Affairs (MEA). #COVID19https://t.co/YcZohhBBILpic.twitter.com/vrokqZxu1S
जगभरातील देशांना कमी दरात चांगल्या लसीची प्रतिक्षा आहे. यासाठी त्यांनी भारताकडे कूच केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने महिनाभरापूर्वी 190 देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना कोरोना-१९ लसीबाबत माहिती दिली होती. यानुसार पहिल्यांदा या 64 देशांच्या प्रतिनिधींना हैदराबादला नेले जात आहे. यानंतर गुजरात, पुण्यातही नेले जाणार आहे.
12 वाजता मोठी बैठक
फायझर, सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकने दिलेल्या आपत्कालीन अर्जांवर आज मोठी बैठक होणार आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या अर्जांची पडताळणी करणार आहेत. या लसींवर गठित केलेली विशेषज्ञांची समिती आज १२ वाजता बैठक घेणार आहे. यामध्ये या अर्जांवर निर्णय होण्याची शक्यता आहे.