Gagandeep Kang : भारत Covid Vaccine खरेदीच्या शर्यतीत मागे राहिला; व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 12:06 PM2021-05-24T12:06:42+5:302021-05-24T12:08:55+5:30

Top Virologist Gagandeep Kang : India lags behind in race to buy Covid 19 Vaccine गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय ऑक्सिजनर स्थापन केलेल्या समितीच्या सदस्याही आहेत. भारतानं लस खरेदीसाठी उशिर केला, कांग यांचं वक्तव्य.

India lags behind in race to buy Covid 19 Vaccine Virologist Gagandeep Kang reacts | Gagandeep Kang : भारत Covid Vaccine खरेदीच्या शर्यतीत मागे राहिला; व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांची प्रतिक्रिया

Gagandeep Kang : भारत Covid Vaccine खरेदीच्या शर्यतीत मागे राहिला; व्हायरोलॉजिस्ट गगनदीप कांग यांची प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देभारतानं लस खरेदीसाठी उशिर केला, कांग यांचं वक्तव्य.गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयानं वैद्यकीय ऑक्सिजनर स्थापन केलेल्या समितीच्या सदस्याही आहेत.

सध्या भारतात दुसऱ्या लाटेमुळे Corona Virus हाहाकार माजला आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मृतांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा पर्याय असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, लसींच्या खरेदीबाबत टॉप व्हायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांनी (Top Virologist Gagandeep Kang) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अमेरिकेनं देशवासीयांना कोरोना प्रतिबंधातम्क लस देण्यासाठी ऑपरेशन वार्प स्पीड (Operation Warp Speed) मार्च २०२० मध्ये सुरु केलं होतं. त्यावेळी कोणतीही लस विकसित झाली नव्हती. परंतु भारतानं लसीच्या (Covid Vaccine) वैद्यकीय चाचणीसाठी कोणत्याही प्रकारचा निधी दिला नव्हता किंवा लसीच्या ऑर्डरसाठी कोणत्याही प्रकारची आगाऊ रक्कम दिली नव्हती," असं कांग म्हणाल्या. भारतानं लस खरेदी करण्याच्या शर्यतीत उशीर केला आहे आणि आता भारताकडे मोजक्या प्रमाणात पर्याय उपलब्ध असल्याचंही त्या म्हणाल्या. Top Virologist Gagandeep Kang : India lags behind in race to buy Covid 19 Vaccine.

गगनदीप कांग या सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय ऑक्सिजनसाठी असलेल्या समितीच्या सदस्य आहेत. "संपूर्ण जग गेल्या वर्षभरापासून जोखीम पत्करून लस खरेदीसाठी सरसावलं होतं. परंतु आता बाजारात आपल्यासाठी सप्लाय चेन शिल्लक आहे का आता आपण म्हणतोय आम्हाला लस खरेदी करायची आहे," असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एनडीटीव्हीशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. डॉ. कांग यांचं हे वक्तव्य अशावेळी समोर आलं आहे जेव्हा अनेक राज्यांनी लसींच्या पुरवठ्यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा काही राज्यांनी ही पावलं उचलली आहेत.

... तर उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करण्यासाठी अनेक राज्यांनी ही पावलं उचलली आहेत. अनेक राज्यांमध्ये  लसींच्या योग्य प्रणामात होत नसलेल्या पुरवठ्यामुळे लसीकरण केंद्र बंद झाल्याचंही सांगण्यात येत आहे. "जर तुम्ही झायडस कँडिला, बायोलॉजिकल ई सारख्या कंपन्यांकडे जाऊ शकता ज्यांची लस या वर्षाच्या अखेरीस येणार आहे. तुम्ही त्यांना लसींच्या उत्पादनात वेग आणण्यास आणि उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगू शकता. जर तुमच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर आम्ही सर्व लसी खरेदी करू असं सांगता येईल. याप्रकारे आपल्याला अधिक लसी मिळू शकतील, असंही त्या म्हणाल्या.

चाचणीप्रक्रियेदरम्यान गुंतवणूक

काँग या रॉयल सोसायटीच्या फेलो बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. चाचणी प्रक्रियेदरम्यान लसीबाबत गुंतवणूक करण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "मी निश्चितच असं सांगेन की आपल्याला  अशी गुंतवणूक करायला हवी. "आपण  याद्वारे प्रमाण सिद्ध करू, तसंच आपण संशोधन आणि नावीन्यपूर्ण गुंतवणूकीस तयार असल्याचेही सांगू शकतो," असंही त्या म्हणाल्या.

Web Title: India lags behind in race to buy Covid 19 Vaccine Virologist Gagandeep Kang reacts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.