अद्भूत..!! अंतराळ क्षेत्रात भारताची मोठी झेप; पहिले 'पुन्हा वापरता येणारे' हायब्रीड रॉकेट लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 10:12 AM2024-08-24T10:12:41+5:302024-08-24T10:23:42+5:30
India launches reusable hybrid rocket: या रॉकेटला RHUMI-1 असे नाव देण्यात आले आहे. स्टार्टअप कंपनी स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे केले विकसित
India launches reusable hybrid rocket RHUMI-1: भारताने अंतराळ क्षेत्रात एक मोठी अद्भूत कामगिरी करुन दाखवली आहे. भारताने आज एक असे रॉकेट अंतराळात लाँच केले, जे पुन्हा वापरता येणार आहे. याला हायब्रिड रॉकेट म्हटले असून हे आज सकाळी यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आले. या रॉकेटला RHUMI-1 असे नाव देण्यात आले असून ते तामिळनाडूस्थित स्टार्टअप कंपनी स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. चेन्नईच्या थिरुविदनाधाई येथून मोबाईल प्रक्षेपणाच्या मदतीने पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले. रॉकेटने ३ क्यूब उपग्रह आणि ५० पीआयसीओ उपग्रह यशस्वीरित्या उप-कक्षीय मार्गावर ठेवले.
#WATCH | India launches its first reusable hybrid rocket, RHUMI 1. The rocket, developed by the Tamil Nadu-based start-up Space Zone India and Martin Group was launched from Thiruvidandhai in Chennai using a mobile launcher. It carries 3 Cube Satellites and 50 PICO Satellites… pic.twitter.com/Io97TvfNhE
— ANI (@ANI) August 24, 2024
रुमी-1 मुळे रॉकेट प्रक्षेपणाचा खर्च कमी होणार!
हे रॉकेट पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट CO2 ट्रिगर पॅराशूट प्रणालीने सुसज्ज आहे. त्याच्या मदतीने रॉकेटचे विविध घटक सुरक्षितपणे परत येऊ शकतात. त्यामुळे अंतराळ प्रक्षेपणाचा खर्च कमी होणार आहे. अंतराळ क्षेत्राव्यतिरिक्त, हे हायब्रीड रॉकेट कृषी, पर्यावरण निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या कामांमध्येही मदत करेल. या रॉकेटची एअर फ्रेम कार्बन फायबर आणि ग्लास फायबरपासून बनलेली आहे. याशिवाय यात पायरो तंत्रज्ञानाद्वारे विकसित पॅराशूटही बसवण्यात आले आहे. रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात पाठवलेले तीन घन उपग्रह वैश्विक किरणोत्सर्ग, अतिनील विकिरण आणि हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेऊ शकतील.
#WATCH चेन्नई, तमिलनाडु: स्पेस ज़ोन इंडिया और मार्टिन ग्रुप ईसीआर बीच ने पट्टीपुलम में रॉकेट मिशन रूमी 2024 लॉन्च किया। pic.twitter.com/eIIBSzFkkI
— ANI_HindiNews (@AHindinews) August 24, 2024
स्पेस झोन वन कंपनीचे सीईओ आनंद मेगलिंगम यांनी सांगितले की, या रॉकेटच्या मदतीने किरणोत्सर्गाची पातळी, कंपन आणि तापमान आदी माहिती गोळा करता येणार आहे. या प्रकल्पात मदत केल्याबद्दल मेगलिंगम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे आभार मानले. हायब्रीड रॉकेटमध्ये असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही केला जाऊ शकतो, असा दावा आता केला जात आहे.