आळशी लोकांच्या यादीत भारत ३९वा!
By admin | Published: July 15, 2017 12:22 AM2017-07-15T00:22:00+5:302017-07-15T00:22:00+5:30
जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगातील ४६ देशांमध्ये करण्यात आलेल्या आळशी लोकांच्या यादीत भारत ३९ व्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. भारतीय लोक दिवसाला जास्तीत जास्त ४२९७ पावले चालतात, असे या सर्व्हेतून आढळून आले आहे.
स्टॅटफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा सर्व्हे केला असून, त्यात जगतील ४६ देशांमधील तब्बल लाख लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. सर्व्हेत सहभागी झालेले रोज किती चालतात, याची नोंद ठेवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्टेप काउंटर्स अॅप इन्स्टॉल करण्यात आले होते. सर्व्हेच्या निष्कर्षानुसार चीनमधील नागरिक सर्वात कमी आळशी आहेत. त्यातही हाँगकाँगमधील लोक अधिक उत्साही असून, ते दिवसाला किमान ६८८0 पावले चालतात.
इंडोनेशिया हा देश मात्र सर्वात आळशी देश ठरला आहे. दिवसाला किमान ३,५१३ पावले चालणे आवश्यक मानले जाते. मात्र, इंडोनेशियातील लोक त्याच्या निम्मीही पावले चालत नाहीत, असे हा सर्व्हे सांगतो.जगभरातील सरासरी आकडा ४,९६१ पावलं आहे. अमेरिकन लोक दिवसाला ४,७७४ पावले चालतात. हाँगकाँग, चीन, युक्रेन आणि जपान यांनी यादीत वरील स्थान पटकावले असून या देशांमधील नागरिक दिवसाला किमान सहा हजार पावलं चालतात. मलेशिया, सौदी अरेबिया आणि इंडोनेशिया यादीमध्ये सर्वात खाली असून येथील नागरिक दिवसाला जेमतेम ३९00 पावलेच चालतात. सर्व्हेतील मिळालेल्या माहितीनुसार पुरुषांच्या तुलनेत भारतीय कमी चालतात. भारतीय महिला दिवसाला किमान ३,६८४ तर पुरुष ४,६0८ पावले चालतात, असे हा सर्व्हे सांगतो. अधिकाधिक चालल्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण कमी होते. मात्र महिलांनी आपले चालणे बंद वा कमी केल्यास चालणं बंद केल्यास त्यांचा लठ्ठपणा अतिवेगाने वाढतो. महिलांच्या बाबतीत हे प्रमाण २३२ टक्के, तर पुरुषांच्या बाबतीत ६७ टक्के आहे.