CoronaVirus Vaccine: ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना स्वयंसेवकांचा तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 03:32 AM2020-12-18T03:32:35+5:302020-12-18T06:40:36+5:30

नवी अडचण; एम्ससह अन्य केंद्रांवर सारखीच स्थिती

India made Covaxin vaccine faces shortage of volunteers in trial participation | CoronaVirus Vaccine: ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना स्वयंसेवकांचा तुटवडा

CoronaVirus Vaccine: ‘कोवॅक्सिन’च्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना स्वयंसेवकांचा तुटवडा

Next

-  हरीश गुप्ता

नवी दिल्ली : भारत बायोटेक व आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सिन या स्वदेशी बनावटीच्या लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्याकरिता पुरेशा संख्येने स्वयंसेवक उपलब्ध होत नसल्याने नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. दिल्लीतील एम्स तसेच देशातील इतर चाचणी केंद्रांवरच साधारण अशीच स्थिती आहे.

कोवॅक्सिन या लसीच्या तिसºया टप्प्यातील चाचण्या देशातील १२ विविध केंद्रांमध्ये सध्या सुरू आहेत. या लसीच्या आपत्कालीन वापराला मान्यता मिळावी म्हणून आयसीएमआरने केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. सुमारे १२०० ते १५०० स्वयंसेवकांची एम्समधील चाचणी केंद्राला आवश्यकता आहे. मात्र सध्या तिथे फक्त २०० स्वयंसेवकच उपलब्ध आहेत. देशात दक्षिणेकडील काही राज्ये सोडली तर अन्य राज्यांतल्या चाचणी केंद्रांमधील परिस्थितीही साधारण अशीच आहे.

कोवॅक्सिन लसीच्या चाचण्यांची पुरेशा संख्येने स्वयंसेवक मिळत नसल्याच्या वृत्ताबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास या लसीच्या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. संजय राय यांनी नकार दिला. मात्र या लसीच्या तिसºया टप्प्यासाठी स्वयंसेवक हवेत असे पत्रक एम्सने आपल्या वेबसाइटवर या आठवड्यात झळकविले आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्यातील काही स्वयंसेवकांना कोवॅक्सिन लसीचे दोन डोस देण्यात येतील. अनेक स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस दिला जाईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला सहा आठवडे लागतील. त्यानंतरच औषध महानियंत्रक या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्याबाबत विचार करतील.

लस उपलब्ध होण्याच्या अतिप्रचारामुळे उदासीनता
भारतात डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये एकाहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होणार असा अतिप्रचार आधीपासून झाला आहे. मात्र त्याचा विपरित परिणाम होऊन कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याकरता स्वयंसेवक आपले नाव नोंदविण्यास उत्सुक नाहीत.

Web Title: India made Covaxin vaccine faces shortage of volunteers in trial participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.