पाकला घडवली अद्दल, भारताने केले सात सैनिक ठार; सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:35 AM2018-01-16T05:35:54+5:302018-01-16T11:29:32+5:30

पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले

India made seven soldiers dead; Six terrorists clash | पाकला घडवली अद्दल, भारताने केले सात सैनिक ठार; सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

पाकला घडवली अद्दल, भारताने केले सात सैनिक ठार; सहा दहशतवाद्यांना कंठस्नान

Next

श्रीनगर : पाकिस्तानकडून सतत होणाºया शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने सोमवारी चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे सात जवान ठार झाले असून, चार जण जखमी झाले आहेत. पूंछ सेक्टरमध्ये भारताने ही कारवाई केली. याशिवाय सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आज सकाळी उल्लंघन करताच, भारतीय जवानांनी मेंढर सेक्टर भागात पाकच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार केला.
पाकने राजोरी सेक्टरमध्ये शनिवारी केलेल्या गोळीबारात लान्स नायक योगेश भदाणे शहीद झाले होते. पाककडून सतत निष्कारण होणाºया गोळीबारामुळे भारतीय जवानही अस्वस्थ होते. त्यांनी आज पाकला सडेतोड धडा शिकवला. त्याआधी जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ते सारे जण पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते, असे लष्कराच्या प्रवक्याने सांगितले.

पाकने केले मान्य
भारताने केलेल्या गोळीबारात चार सैनिक मरण पावल्याचे पाकिस्तानी सैन्याने मान्य केले आहे. मात्र तीन भारतीय जवानही या वेळी ठार झाले, असा दावा पाकिस्तानने केला आहे. त्यांच्या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही.

सहाव्या अतिरेक्याचा शोध सुरू : आम्ही घटनास्थळावरून पाच दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आमच्या मते सहा दहशतवादी ठार झाले आहेत. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

१५ जानेवारी हा भारतीय सैन्य दिन आहे. या दिवशी लष्करातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच हुतात्मा झालेल्या जवानांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. यानिमित्ताने लष्करप्रमुख जवानांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे भाषणही करतात. या वर्षी आजच्या दिवशीच भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला.

ही कारवाई उरी सेक्टरमध्ये करण्यात आली. जम्मू व काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी मिळून दहशतवाद्यांचा भारतात घुसण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
- एस.पी वैद, पोलीस महासंचालक, जम्मू-काश्मीर

लष्करप्रमुख बिपीन रावतांचा पाकिस्तानला कठोर इशारा
नवी दिल्ली : पाकिस्तानने भाग पाडले तर दहशतवादी गटांविरोधातील आक्रमक उपाययोजना वाढवायला लष्कर तयार आहे, अशा कठोर शब्दांत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पाकला सोमवारी इशारा दिला. जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतविरोधातील कारवाया यशस्वी होऊ दिल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Web Title: India made seven soldiers dead; Six terrorists clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.