जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:21 PM2024-08-08T22:21:50+5:302024-08-08T22:21:58+5:30
देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने विविध देशात आपले बेस तयार केले आहे.
India Military Bases in Other Countries: मागील काही वर्षांपासून जगाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कुठे युद्ध सुरू आहे, तर कुठे प्रचंड अस्थिरता पसरली आहे. भारताच्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली, तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती कोणापासून लपून राहिलेली नाही. अशीच स्थिती श्रीलंकेची आहे. अफगाणिस्तानात तर तालिबानचे सरकार आहे. म्यानमारमध्येही लष्करी राजवट आहे. आता बांग्लादेशातही निवडून आलेले सरकार पाडण्यात आले. चीनची विस्तारवादी विचारसरणीही सर्वांनाच ज्ञात आहे.
शेजारचे वातावरण असे असल्यामुळे भारताला 24/7 अलर्ट मोडमध्ये राहावे लागते. त्यामुळेच भारत सातत्याने स्वतःला आणखी मजबूत करत आहे. भारत आपल्या तिन्ही सैन्य दलाची ताकद वाढवत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, केवळ आपल्या देशातच नाही, तर जगातील विविध देशांमध्ये भारताने आपला लष्करी तळ(मिल्ट्री बेस) तयार केला आहे. युद्धजैन्य परिस्थितीत शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत फार पूर्वीपासून तयारी करत आला आहे.
ताजिकिस्तान
ताजिकिस्तानच्या दक्षिणेकडील सुलतित फरखोर एअरबेस हा भारताचा पहिला लष्करी हवाई बेस आहे. ताजिकिस्तानच्या हवाई दलाच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाने मध्य आशियात त्याची स्थापना केली.
भूतान
भूतान हा भारताचा जवळचा मित्र आहे. भारतीय सैन्य भूतानच्या रॉयल भूतान आर्मी आणि रॉयल बॉडीगार्डला प्रशिक्षण देते.
मादागास्कर
हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे, जिथे भारताचा लष्करी तळ आहे. याची स्थापना 2007 साली झाली. हा भारताचा परदेशातील पहिला इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स गोळा करणारा बेस कॅम्प आहे.
मॉरिशस
मॉरिशसच्या अगालेगा बेटावर भारताचा लष्करी तळ आहे. हे हिंद महासागरातील भारत-मॉरीशस लष्करी सहकार्य कराराद्वारे बांधले गेला आहे. ही भारतासाठी एक महत्त्वाची धोरणात्मक पोस्ट आहे.
ओमान
रास अल हद, ओमान येथे भारताची पोस्ट असून, दुक्ममध्ये दुसरी पोस्ट आहे. Duqm मध्ये भारतीय नौदल आणि हवाई दलाचा तळ आहे, जो लॉजिस्टिक सहाय्य आणि देखभाल सेवा पुरवतो.
सिंगापूर
भारत आणि सिंगापूरच्या सहकार्यानेच चांगी नौदल तळावर भारताचेा बेस उभारण्यात आला आहे. या सुविधेद्वारे भारतीय नौदलाची जहाजे मलाक्काच्या आखातात गस्त घालतात. धोरणात्मक दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे.