भारताने दरवर्षी एका 'शिकागो'ची निर्मिती करण्याची गरज- हरदीप पुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 01:22 PM2018-07-12T13:22:36+5:302018-07-12T13:23:05+5:30
भारतात सध्या वेगाने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरात राहात असेल.
न्यू यॉर्क- भारतामध्ये शहरीकरणाचा वेग अत्यंत जास्त असून दिवसेंदिवस हा वेग वाढतच आहे. 2030 साली भारतातील 40 टक्के लोकसंख्या शहरामध्ये स्थायिक झालेली असेल. त्यामुळे 2030 पर्यंत भारताला दरवर्षी एका शिकागो शहराएवढ्या शहराची निर्मिती करावी लागेल असे मत केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी व्यक्त केले.
#HLPF “#India’s urban agenda will constitute the defining project of 21st Century- new housing projects (11 M) in #women’s names, or jointly owned.” HE Hardeep Singh Puri, Minister of Housing & Urban Affair/President @UNHABITAT’s Governing Council 🇮🇳 #Goal11@IndiaUNNewYorkpic.twitter.com/pSWGfqcMRr
— UN-Habitat New York (@UNHABITAT_NY) July 11, 2018
शाश्वत विकास या विषयावर हाय लेवल पॉलिटिकल फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी आरले मत व्यक्त केले. हरदीप पुरी गृहनिर्माण व शहरविकास खात्याचे राज्यमंत्री आहेत. शहरीकरणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, भारतातील 60 कोटी लोक 2030 पर्यंत शहरांमध्ये राहायला लागतील. त्याचा अंदाज घेऊन भारताला आतापासूनच 2030 पर्यंत प्रत्येकवर्षी 70 कोटी ते 40 कोटी चौरस मीटर आकाराची अर्बन स्पेस म्हणजे शहरीकरणासाठी भूमी तयार ठेवावी लागेल. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास भारताला 2030 पर्यंत शहरीकरणाची गरज पूर्ण करण्यासाठी एका शिकागो शहराची निर्मिती करावी लागेल. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्राचे अधिकारी, नागरिक, नगर नियोजनकार आणि इतर अनेक अधिकारी उपस्थित होते.
2030 साली आवश्यकता भासेल अशा शहरांसाठी 70 टक्के पायाभूत व्यवस्थांची निर्मिती भारताने करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्राने जगभरातील विकासासाठी 2030 हे लक्ष्य ठेवले आहे. जर भारताला आपले लक्ष्य साध्य करण्यात यश आले तर संयुक्त राष्ट्राचे लक्ष्य साध्य होईल असे मत पुरी यांनी व्यक्त केले. जगभरामध्ये विकसनशील देशांमध्ये शहरीकरण वेगाने होत आहे. 2018-2050 या काळामध्ये भारत, नायजेरिया आणि चीन या देशांचा जागतिक शहरीकरणाच्या वृद्धीतील 35 टक्के वाटा असेल.