'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 22:13 IST2025-02-28T22:11:11+5:302025-02-28T22:13:11+5:30
IAF Chief On Fighter Jet: 'स्वदेशी यंत्रणा रातोरात तयार करणे कठीण आहे, पण अशक्य नाही.'

'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट
IAF Chief Marshal AP Singh: जागतिक अस्थिरतेच्या काळात प्रत्येक देशाने आपले संरक्षण क्षेत्र अधिकाधिक मजबूत करणे गरजेचे बनले आहे. भारतही सातत्याने देशाच्या सुरक्षेसाठी एकापेक्षा एक आधुनिक हत्यारांचे उत्पादन आणि आयात करत आहे. अशातच, भारताचे हवाईदल प्रमुख एपी सिंग यांनी एक मोठी मागणी केली. भारताला दरवर्षी किमान 40 ते 50 लढाऊ विमाने बनवण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे सोपे नाही, पण अशक्यही नसल्याचे त्यांनी म्हटले.
चाणक्य डायलॉग्स या यूट्यूब चॅनलच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना एअर चीफ मार्शल म्हणाले की, स्वदेशी प्रणालीने जरी माझी कामगिरी थोडी कमी केली, तरी मला त्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वदेशी यंत्रणा रातोरात तयार करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. यासाठी वेळ लागेल आणि त्यासाठी समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल यासाठी कोणत्याही संशोधन आणि विकास प्रकल्पासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
देशाला दरवर्षी 40 ते 50 लढाऊ विमाने तयार करावी लागतील
वायुसेना प्रमुख पुढे म्हणाले की, भारताने दरवर्षी किमान 35-40 लढाऊ विमाने तयार करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, जेणेकरुन जुन्या विमानांच्या जागी नवीन विमाने वापरता येतील. मला माहिती आहे की, हे काम एका रात्रीत होऊ शकत नाहीत, परंतु या दिशेने आपण स्वत:ला पुढे जावे लागेल. मेक इन इंडियासाठी कोणताही खाजगी उद्योग येत असेल तर आम्ही त्यांच्या वतीने दरवर्षी 12-18 विमाने जोडू शकतो. प्रदीर्घ युद्ध लढण्यासाठी स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या महत्त्वावरही त्यांनी यावेळी भर दिला.