India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 05:56 PM2020-06-13T17:56:20+5:302020-06-13T18:03:26+5:30

नेपाळी पोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार तर दोन जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी लगन रायला येथून नेले. भारत आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर नेपाळ पोलिसांनी शनिवारी लगन यांना  सोडले.

India Nepal Firing Case : Nepal police dragged me across the Indian border and beat me with a rifle | India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण 

India Nepal Firing Case : आपबिती! नेपाळ पोलीस मला भारतीय सीमेवरून फरफटत घेऊन गेले, रायफलने केली मारहाण 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी मला नेपाळमध्ये पकडले याची कबुली देण्यासाठी माझ्यावर दबाव आला. तर सत्य हे आहे की, पोलिसांनी मला भारतातून पकडून नेपाळमध्ये नेले होते. नेपाळहून शुक्रवारी सोनबरसा येथील जानकी नगर येथे सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एक तरुण ठार झाला.

सीतामढी - बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील जानकी नगरातील लालबंदी बॉर्डरजवळ शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामस्थ आणि नेपाळ सशस्त्र दलाच्या जवानांमध्ये झटापट झाली. नेपाळीपोलिसांच्या गोळीबारात एक भारतीय ठार तर दोन जखमी झाले. नेपाळ पोलिसांनी लगन रायला येथून नेले. भारत आणि नेपाळमधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चेनंतर नेपाळ पोलिसांनी शनिवारी लगन यांना  सोडले.

भारतात येऊन लगन यांनी शुक्रवारी घडलेल्या घटनेविषयी सांगितले. लगन म्हणाले की, नेपाळ पोलिस मला संग्रामपुरात घेऊन गेले. मला रायफलने मारहाण करण्यात आली. पोलिसांनी मला नेपाळमध्ये पकडले याची कबुली देण्यासाठी माझ्यावर दबाव आला. तर सत्य हे आहे की, पोलिसांनी मला भारतातून पकडून नेपाळमध्ये नेले होते.

लगन म्हणाले की, माझ्या मुलाचे लग्न नेपाळमधील मुलीशी झाले आहे. त्यांची पत्नी सीमेवर आईला भेटायला गेली. माझा मुलगासुद्धा त्याच्याबरोबर गेला होता. नेपाळ पोलीस सीमेवर थांबले. नेपाळ पोलिसांनी माझ्या मुलाला काठीने मारहाण केली. मला माहिती मिळाल्यावर मी तिथे पोहोचलो नेपाळ पोलिसांना मारहाण करण्याचे कारण विचारले असता, माझ्यासोबत गैरवर्तन करण्यात आले. सीमेवर उपस्थित नेपाळ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी 10 सैनिकांना बोलावले. या सैनिकांनी सीमेपलिकडे गोळीबार केला, ज्यात आणखी एक व्यक्ती ठार झाला.

नेपाळहून शुक्रवारी सोनबरसा येथील जानकी नगर येथे सीमेवर गोळीबार करण्यात आला. त्यात एक तरुण ठार झाला. तीनजण जखमी झाले. दोन लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जानकीनगर हा बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात येतो. सशस्त्र सीमा बाल (एसएसबी) डीजी कुमार राजेश चंद्र म्हणाले, ही आपापसातला वादाचे प्रकरण आहे. हा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

 

काबुल हादरलं!  नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू 

 

थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका

 

न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल 

 

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Web Title: India Nepal Firing Case : Nepal police dragged me across the Indian border and beat me with a rifle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.