भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी कानपूरमध्ये
By admin | Published: June 29, 2016 05:45 AM2016-06-29T05:45:02+5:302016-06-29T05:45:02+5:30
न्यूझीलंडचा संघ आगामी सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे.
नवी दिल्ली : न्यूझीलंडचा संघ आगामी सप्टेंबर- आॅक्टोबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले जातील. पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर २२ ते २६ सप्टेंबर या कालावधीत खेळला जाईल.
या दौऱ्याची घोषणा बीसीसीआयने आगळ्यावेगळ्या प्रकारे केली. कर्णधार विराट कोहली याने स्वत:च्या टिष्ट्वटर हँडलवर दौऱ्याची माहिती दिली. यानंतर अजिंक्य रहाणे याने दुसरी कसोटी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ३० सप्टेंबर ते ४ आॅक्टोबरदरम्यान खेळली जाईल, असा खुलासा केला. मोहंमद शमीने यानंतर टिष्ट्वट करताना सांगितले, की दौऱ्यातील तिसरा आणि अखेरचा सामना ८ ते १२ आॅक्टोबर या कालावधीत ईडन गार्डन्सवर खेळला जाईल.
महान क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांचे जन्मस्थान असलेल्या इंदूरमध्ये पहिल्यांदा कसोटी सामना होणार आहे. टीम इंडिया स्थानिक सत्राची सुरुवात कानपूरमधून करणार आहे. या शिवाय पाच वन-डे सामन्यांची मालिकादेखील होईल. पहिला सामना धर्मशाला येथे १६ आॅक्टोबरला, दुसरा सामना १९ आॅक्टोबरला दिल्लीत, तिसरा सामना २३ आॅक्टोबरला मोहालीत, चौथा सामना रांची येथे २६ आॅक्टोबरला आणि पाचवा सामना विशाखापट्टणम् येथे २९ आॅक्टोबरला खेळला जाईल. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ नव्या सत्राची सुरुवात करणार असल्याने ही मालिका महत्त्वपूर्ण असेल.’’ खेळाडूंकडून दौऱ्याची घोषणा करण्याची परंपरा खेळाडू आणि प्रेक्षक यांना आणखी जवळ आणेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(वृत्तसंस्था)
>न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली कसोटी
२२ ते २६ सप्टेंबर, कानपूर
दुसरी कसोटी
३० सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर, इंदूर
तिसरी कसोटी
८ ते १२ आॅक्टोबर, कोलकाता
पहिला वन डे
१६ आॅक्टोबर, धर्मशाला
दुसरा वन डे
१९ आॅक्टोबर, नवी दिल्ली
तिसरा वन डे
२३ आॅक्टोबर, मोहाली
चौथा वन डे
२६ आॅक्टोबर, रांची
पाचवा वन डे
२९ आॅक्टोबर, विशाखापट्टणम्.