भारत-न्यूझीलंड मालिका रद्द होणार नाही - लोढा समिती
By admin | Published: October 4, 2016 03:54 PM2016-10-04T15:54:31+5:302016-10-04T15:54:31+5:30
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेली मालिका रद्द होणार नाही असं स्पष्टीकरण लोढा समितीने दिलं आहे. त्यामुळे उर्वरीत कसोटी सामना आणि वन-डे मालिकेवरील संकट टळलं
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेली मालिका रद्द होणार नाही असं स्पष्टीकरण लोढा समितीने दिलं आहे. त्यामुळे उर्वरीत कसोटी सामना आणि वन-डे मालिकेवरील संकट टळलं आहे.
सर्व बँकांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) व्यवहार रोखण्याचे आदेश लोढा समितीने दिल्याचे वृत्त आले होते. त्यावर लोढा समितीने स्पष्टीकरण दिले असून बॅंक खाती गोठवण्याचे आदेश दिले नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, बीसीसीआयने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत घेतलेल्या निर्णयांसाठी निधी न देण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत असंही लोढा समितीने स्पष्ट केलं आहे.
बँक खाते गोठवण्यात आले असल्याने ही मालिका रद्द होऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, लोढा समितीच्या स्पष्टीकरणामुळे भारत-न्यूझीलंड मालिका रद्द होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.