लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे

By मोरेश्वर येरम | Published: November 26, 2020 11:56 AM2020-11-26T11:56:12+5:302020-11-26T12:00:51+5:30

गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे.

India No 1 in bribery these figures of corruption are very big | लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे

लाचखोरीत भारत नंबर १; भ्रष्टाचाराचे 'हे' आकडे डोळे विस्फारणारे

Next
ठळक मुद्देआशिया खंडातील देशांमध्ये केलं गेलं सर्वेक्षणभारत पहिल्या क्रमांकावर तर कंबोडियाचा दुसरा नंबर, इंडोनेशिया तिसऱ्या स्थानीजापान आणि मालदिवमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार

नवी दिल्ली
लाचखोरीत भारताची परिस्थिती आशिया खंडातील देशांमध्ये सर्वात वाईट आहे. लाचखोरीच्याबाबतीत आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. 'ट्रान्फरन्सी इंटरनॅशनल' संस्थेच्या याबाबतचे सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

घुसखोरीच्या बाबतीत भारतात घुसखोरीचा दर हा ३९ टक्के इतका आहे. गेल्या १२ महिन्यांमध्ये देशात भ्रष्टारात वाढ झाल्याचं ४७ टक्के लोकांचं मत आहे. तर ६३ टक्के लोकांना वाटतं की भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सरकार चांगलं काम करत आहे. सर्वेक्षणातील माहितीनुसार भारतात सरकारी सुविधांसाठी ४६ टक्के लोक हे वैयक्तिक ओखळीचा वापर करतात. यातील ३२ टक्के लोकांनी लाच दिली नाही तर कामच होत नाही, असं म्हटलं आहे. 

शेजारी देशांमध्ये परिस्थिती काय?
भारतानंतर सर्वाधिक लाचखोरी केली जाणाऱ्या यादीमध्ये कंबोडियाचा दुसरा क्रमांक लागतो. यात ३७ टक्के लोक लाच देतात. तर ३० टक्क्यांसह इंडोनेशिया तिसऱ्या स्थानावर आहे. मालदीव आणि जापानमध्ये लाचखोरीचा दर संपूर्ण आशियात सर्वात कमी आहे. या देशांमध्ये केवळ २ टक्के लोक लाच देण्यासाठीची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे, ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने या सर्वेक्षणात पाकिस्तानचा समावेश केलेला नाही. बांगलादेशमध्ये लाचखोरीचा दर भारतापेक्षा कमी २४ टक्के इतका आहे. तर श्रीलंकेत हाच दर १६ टक्के इतका आहे. 

सरकारी भ्रष्टारामुळे सर्वात जास्त त्रास
ट्रान्फरन्सी इंटरनॅशनलने १७ देशांमधील २० हजार लोकांना काही प्रश्न विचारले. हे सर्वेक्षण जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये घेण्यात आले होते. सर्वेक्षणात सरकारी सेवा देणाऱ्या ६ क्षेत्रांचा समावेश केला गेला होता. सरकारी सेवांमधील भ्रष्टाचारामुळे सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते असे सर्वेक्षणात दर ४ लोकांमागे तीन लोकांचे म्हणणे आहे. तर तीन लोकांमागे प्रत्येकी एक जण आपला लोकप्रतिनिधी भ्रष्ट असल्याचे मानतो. 
 

Web Title: India No 1 in bribery these figures of corruption are very big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.