India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात 6 भारतीयांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 06:26 PM2022-10-07T18:26:10+5:302022-10-07T18:26:20+5:30
India On Pakistan: पाकिस्तानी तुरुंगात मृत्यू झालेल्या 6 कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती.
India On Pakistan: पाकिस्तानीतुरुंगात कैद असलेल्या भारतीयांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 9
पाकिस्तानमध्ये कैद असलेल्या 6 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली होती, पण पाकिस्तानने
त्यांना बेकायदेशीरपणे कैदेत ठेवले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली.
आज माध्यमांशी संवाद साधताना अरिंदम बागची म्हणाले, "पाकिस्तानी तुरुंगात भारतीय कैद्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक
आहे. गेल्या 9 महिन्यांत 6 भारतीयांनी पाकिस्तानच्या ताब्यात आपले प्राण गमावले आहेत, त्यापैकी 5 मच्छिमार होते. चिंतेची
बाब म्हणजे या सर्व 6 जणांची शिक्षा पूर्ण झाली होती.
पिछले 9 महीने में पाकिस्तान की हिरासत में 6 भारतीय लोगों की मौत हुई है जिसमें से 5 मछुआरे थे। इन सभी 6 लोगों ने अपनी सजा पूरी कर ली थी। भारत के द्वारा उनकी देश वापसी की अपील के बावजूद उन्हें गैरकानूनी ढंग से हिरासत में रखा गया: विदेश मंत्रालय के प्रवक्ता अरिंदम बागची pic.twitter.com/RFoVNZowW8
— ANI_HindiNews (@AHindinews) October 7, 2022
इस्लामाबादमधील आमच्या उच्चायुक्ताने भारतीय कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे. सर्व भारतीय कैद्यांची तात्काळ सुटका करून त्यांना भारतात पाठवावे, असे आवाहन पाकिस्तान सरकारला करण्यात आले आहे.'' पत्रकार परिषदेत त्यांनी चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरही भाष्य केले.
चीन आणि म्यानमारचे काय?
अरिंदम बागची म्हणाले, एलएसीवरील डिसइंगेजमेंटसाठी आवश्यक पावले अद्याप सुरू नाहीत. परिस्थिती सामान्य आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. काही सकारात्मक पावले उचलली गेली आहेत, पण काही पावले अजून बाकी आहेत. म्यानमारमध्ये अडकलेल्या सुमारे 50 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.