देशात भाजप सत्तेबाहेर कसा राहणार? अखिलेश यादव यांनी फॉर्म्युला विरोधकांना दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 11:52 AM2023-12-30T11:52:31+5:302023-12-30T11:53:25+5:30

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत.

INDIA Opposition Alliance How will BJP stay out of power in the country? Akhilesh Yadav gave the formula to the opposition | देशात भाजप सत्तेबाहेर कसा राहणार? अखिलेश यादव यांनी फॉर्म्युला विरोधकांना दिला

देशात भाजप सत्तेबाहेर कसा राहणार? अखिलेश यादव यांनी फॉर्म्युला विरोधकांना दिला

देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली असून विरोधी पक्ष एकत्र येत इंडिया आघाडी सुरू केली आहे. दरम्यान आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या  सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांना नवा फॉर्म्युला दिला आहे. भाजपला देशातील सत्तेतून कसे बाहेर फेकले जाऊ शकते हे त्यांनी सांगितले आहे.उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तरच केंद्रातील सत्तेतून  भाजप बाहेर पडेल, असं त्यांनी सांगितलं.

मविआच्या जागावाटपात काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे-पवार गटाला मान्य होणार का?

"२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश सर्वात मोठी भूमिका बजावेल. राज्यातील जनता भाजपचा पराभव करेल. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला तर त्यांची देशातील सत्ता जाईल. समाजवाद्यांनी नारा दिला आहे. ८० चा पराभव करा, भाजपला हटवा. समाजवादी पक्ष हा नारा घेऊन काम करत आहे", असंही अखिलेश यादव म्हणाले.

"उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप सरकार सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. जात जनगणनेच्या विरोधात आहे. जात जनगणनेशिवाय सामाजिक न्याय मिळू शकत नाही.

अखिलेश यादव म्हणाले, 'भाजप सरकारची झिरो टॉलरन्स शून्य झाली आहे. उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. उत्तर प्रदेशात मुली, माता आणि बहिणींवर सर्वाधिक अन्याय होत आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून देशात एक लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचे उत्तर भाजपकडे नाही.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रणाबाबत बोलताना यादव म्हणाले, देवाकडून कुणालाही निमंत्रण मिळत नाही, देव स्वत: ज्याला हवे त्याला निमंत्रण देतो. देव आपोआप बोलावतो. देवाने बोलावले तर आपण जाऊ.

'इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल'

'इंडिया' आघाडीच्या जागावाटपावर अखिलेश यादव म्हणाले, जागा वाटप हा मोठा प्रश्न नाही, तर येणार्‍या निवडणुकीत विरोधी आघाडी भारतीय जनता पक्षाचा पराभव करेल का हा मोठा प्रश्न आहे. भाजपला हटवून लोकशाही वाचेल आणि ईव्हीएम आपोआप हटतील, असा समाजवादी पक्षाचा विश्वास आहे, असंही ते म्हणाले. 'भाजप सरकार लोकशाहीविरोधी आहे. भाजप पुन्हा आले तर जनतेचा मतदानाचा हक्क हिरावून घेईल. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराने जनता त्रस्त आहे. कोणालाच न्याय मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपचा पराभव करेल, असा विश्वासही अखिलेश यादव यांनी व्यक्त केला. 

Web Title: INDIA Opposition Alliance How will BJP stay out of power in the country? Akhilesh Yadav gave the formula to the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.