४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 09:22 AM2024-05-27T09:22:42+5:302024-05-27T09:25:05+5:30

Lok Sabha Election 2024 India Opposition Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीची मतमोजणी, अरविंद केजरीवाल यांची पुन्हा तिहार तुरुंगात रवागनी या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.

india opposition alliance meet on 1 june before counting of lok sabha election 2024 | ४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण

४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण

Lok Sabha Election 2024 India Opposition Alliance Meeting: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्याचे मतदान होणार असून, त्यानंतर ०४ जूनला मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. इंडिया आघाडीकडून ३५० जागा जिंकण्याचा दावा केला जात असतानाच एनडीए ४०० पारचा नारा देताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची एक बैठक ०१ जून रोजी बोलावण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीत सामील असलेल्या सर्व पक्षांची एक बैठक ०१ जून रोजी बोलावण्यात आली असून, ०४ रोजी मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली गेली आहे. विशेष म्हणजे ०२ जून रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रवानगी पुन्हा एकदा तिहार तुरुंगात होणार आहे. या पूर्वी ०१ जून रोजी इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे. 

केजरीवाल, स्टॅलिन, अखिलेश यांना निमंत्रण

लोकसभा निवडणुकीतील इंडिया आघाडीच्या कामगिरीचा आढावा आणि पुढील वाटचाल, याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि इतरांसह विरोधी आघाडीतील सर्व पक्षांच्या प्रमुखांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर काँग्रेसने दावा केला होता की, इंडिया आघाडीने २७२ जागांचा टप्पा ओलांडला असून, एकूण ३५० जागांवर विजय मिळेल. जयराम रमेश यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत, भाजपाचा पराभव निश्चित असल्याचे दावा केला आहे. प्रत्येक ग्राउंड रिपोर्टवरून हे पूर्णपणे स्पष्ट होते की, वाऱ्याची दिशा बदलत आहे. त्याने वादळाचे रूप धारण केले आहे. इंडिया आघाडी एनडीएचा पराभव करणार आहे. ४ जून येत आहे! भारत बदलेल, इंडिया आघाडी जिंकेल!, असे जयराम रमेश म्हणाले होते.
 

Web Title: india opposition alliance meet on 1 june before counting of lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.