इंडिया की भारत? सोशल मीडियावर लोकांनी निकालच लावला; दिवसभरात सर्वाधिक सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 08:50 AM2023-09-06T08:50:30+5:302023-09-06T08:50:43+5:30

इंडिया की भारत अशा दोन नावांच्या द्विधा मनस्थितीत असताना सोशल मीडियावर भारत हा शब्द कालच्या दिवसातील सर्वाधिकवेळा सर्चमध्ये आला आहे. 

India or Bharat? People took to social media to judge; Most searches of the day | इंडिया की भारत? सोशल मीडियावर लोकांनी निकालच लावला; दिवसभरात सर्वाधिक सर्च

इंडिया की भारत? सोशल मीडियावर लोकांनी निकालच लावला; दिवसभरात सर्वाधिक सर्च

googlenewsNext

राष्ट्रपतींच्या निमंत्रण पत्रिकेवर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख झाला आणि येत्या विशेष अधिवेशनात काय होणार आहे याची कल्पना देशवासियांना आली आहे. घटनेतील इंडिया हा शब्द काढून टाकला जाऊ शकतो, यासाठी सुधारणा विधेयक आणले जाणार आहे. यातच इंडिया की भारत अशा दोन नावांच्या द्विधा मनस्थितीत असताना सोशल मीडियावर भारत हा शब्द कालच्या दिवसातील सर्वाधिकवेळा सर्चमध्ये आला आहे. 

इंडिया आणि भारत हे नाव कसे ठेवले गेले...; जाणून घ्या संविधान बनवितानाची कहानी

ट्विटर म्हणजेच आताच्या एक्सवर मंगळवारी भारत हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च केला गेला आहे. जगभरात भारत हा की वर्ड सर्वाधिकवेळा वापरला गेला आहे. जगभरातील युजर्सनी चार लाख ७४ हजार वेळा भारत कीवर्ड आपल्या पोस्टमध्ये वापरला आहे. 

G20 शिखर परिषद 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. राष्ट्रपती भवनातून परदेशी पाहुण्यांना डिनरमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पत्र पाठवण्यात आले आहे. निमंत्रण पत्रावर इंडियाच्या राष्ट्रपतींऐवजी 'भारत'चे राष्ट्रपती लिहिले होते. यावरून दिवसभर बराच वाद झाला आहे. 

हे आहेत सर्वाधिक वापरलेले कीवर्ड...
भारत: 474k
Beyonce: 350k
कलम 1: 284k
प्रदामोडे: 253 किमी
शिक्षक दिन: 165k
कार्डी: 116k
पुग्डेमॉन्ट: 110k
क्लेमसन: 100k
ड्यूक: 83k
wwe raw: 81k

Web Title: India or Bharat? People took to social media to judge; Most searches of the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.