भारत-पाककडून परस्परांच्या भूमीवर तपास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2016 12:59 AM2016-03-28T00:59:30+5:302016-03-28T00:59:30+5:30

मोदी सरकारने पाकिस्तानच्या तपास चमूला पठाणकोट हवाईतळात प्रवेशाची संधी दिली असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेचा चमू (एनआयए) पाकिस्तानला लवकरच भेट देणार असल्याचे

India-Pak interrogation land! | भारत-पाककडून परस्परांच्या भूमीवर तपास !

भारत-पाककडून परस्परांच्या भूमीवर तपास !

Next

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
मोदी सरकारने पाकिस्तानच्या तपास चमूला पठाणकोट हवाईतळात प्रवेशाची संधी दिली असतानाच राष्ट्रीय तपास संस्थेचा चमू (एनआयए) पाकिस्तानला लवकरच भेट देणार असल्याचे समीकरण जुळवून आणण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते.
जानेवारीमध्ये पठाणकोट येथे अतिरेक्यांनी हल्ला केल्यापासून तपासाचा मुद्दा भिजत घोंगडे बनला होता. भारतीय तपास संस्थेच्या चमूलाही पाकला भेट देण्याला मुभा दिली जावी यासाठी पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थेने सहमती दर्शविल्याचे संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ले. जन. नासीर खान जान्जुआ यांच्यातील दीर्घ चर्चेचे हे फलित मानले जाते. डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचेही मन वळवावे लागले. विदेशमंत्री सुषमा स्वराज या पाकच्या तपास चमूला भारतभेटीची परवानगी देण्याला अनुकूल होत्या. भारताच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तानकडूनही प्रतिसाद मिळू शकतो.

हवाईतळावरील प्रवेश मर्यादित...
पाकिस्तानच्या तपास चमूला पठाणकोटच्या हवाईतळावरील क्षेत्रात ठराविक भागापुरताच प्रवेश मर्यादित राहणार आहे. पठाणकोट हल्ल्याचा डाव साधण्यात पूर्णपणे यश मिळवता आले नसले तरी, पाकिस्तानच्या प्रशिक्षित अतिरेक्यांनी भारतात घुसून विध्वंस कसा घडवून आणला, या अनुषंगाने तपासाला परवानगी देण्यामागे डोवाल यांचे कौशल्य आणि प्रयत्न असल्याचे मानले जाते. भारतीय उपखंडात दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध लढा देण्यात पाकिस्तानने प्रामाणिकपणा दाखवावा, असे पटवून देण्यात डोवाल यांना यश मिळाले.

एनआयए देणार लवकरच भेट
पाकिस्तानच्या तपास पथकाने पाकिस्तानात परतून अहवाल पाठविल्यानंतर पठाणकोट हल्ल्यात सहभागी अतिरेक्यांच्या काही संशयित पाकिस्तानी नागरिकांशी असलेल्या संबंधाबाबत एनआयएकडून तपास केला जाणार आहे. अद्याप पाकिस्तानने या भेटीच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत.

आयएसआयकडून अनुकूलता...
बदलत्या परिस्थितीत कोणताही करार न करता भारतासोबत सहकार्याचे नवे पर्व सुरू करण्यामागे पाकिस्तानच्या सरकारसोबतच आयएसआय या पाकिस्तानी आंतरगुप्तचर सेवा संस्थेची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे दिसते.

Web Title: India-Pak interrogation land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.