भारत-पाकिस्तान बॉर्डर करणार बंद - राजनाथ सिंह

By admin | Published: October 7, 2016 02:22 PM2016-10-07T14:22:26+5:302016-10-07T14:59:37+5:30

केंद्रीय गृहमंत्रालयाने डिसेंबर 2018पर्यंत भारत-पाकिस्तानची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

India-Pakistan border closes - Rajnath Singh | भारत-पाकिस्तान बॉर्डर करणार बंद - राजनाथ सिंह

भारत-पाकिस्तान बॉर्डर करणार बंद - राजनाथ सिंह

Next

ऑनलाइन लोकमत

जोधपूर, दि.7 - केंद्रीय गृहमंत्रालयाने डिसेंबर 2018पर्यंत भारत-पाकिस्तानची सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. ही माहिती देत असताना त्यांनी 'देशाच्या सुरक्षेसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही', असेही स्पष्ट केले आहे. यासंदर्भात, राजनाथ सिंह यांनी भारत-पाकिस्तान सीमेलगची राज्ये राजस्थान, पंजाब, गुजरात, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. राजस्थानमधील जैसलरमेर ही बैठक घेण्यात आली. 
 
देशात घुसखोरी टाळण्यासाठी सीमेरेषेवर हायटेक सेंसर आणि लेझर तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाणार आहे. सीमारेषेवर वारंवार अन्य देशांकडून होणारी घुसखोरी,  विशेषतः पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी देशाच्या सीमेवरील सुरक्षा आणखी वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत.  
 

Web Title: India-Pakistan border closes - Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.