भारत, पाकिस्तानने अटक केलेल्या शेकडो मच्छीमारांची सुटका करावी, दिवाळीआधी निर्णय घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 05:52 AM2021-10-29T05:52:59+5:302021-10-29T05:54:47+5:30

Fisherman : जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

India, Pakistan demand release of hundreds of fisherman arrested | भारत, पाकिस्तानने अटक केलेल्या शेकडो मच्छीमारांची सुटका करावी, दिवाळीआधी निर्णय घेण्याची मागणी

भारत, पाकिस्तानने अटक केलेल्या शेकडो मच्छीमारांची सुटका करावी, दिवाळीआधी निर्णय घेण्याची मागणी

googlenewsNext

नवी दिल्ली :  भारत व पाकिस्तानने अटक केलेल्या परस्परांच्या मच्छिमारांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुटका करावी. पाकिस्तानने त्याच्या ताब्यातील ३७६ भारतीय मच्छिमारांची मुक्तता करावी, अशी मागणी पाकिस्तान - इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी या संघटनेने केली आहे. 
या संघटनेचेे माजी सचिव व पत्रकार जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या कराची येथील मलिर कारागृहामध्ये ५९० भारतीय मच्छिमार आहेत. त्यातील ३७६ मच्छिमार भारतीय नागरिक असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. त्यापैकी २ मच्छिमारांच्या शिक्षेचा कालावधी २०१७ सालीच संपला आहे. अन्य मच्छिमारांपैकी ३२ जणांचा २०१८ व १५३ जणांचा २०१९, तर ८१ मच्छिमारांचा शिक्षेचा कालावधी २०२०मध्ये संपला आहे. जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

Web Title: India, Pakistan demand release of hundreds of fisherman arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.