आशिया कप टी-20मध्ये आज भारत - पाकिस्तान आमने सामने

By admin | Published: February 27, 2016 05:56 PM2016-02-27T17:56:53+5:302016-02-27T17:59:19+5:30

आशिया कप टी20 मधील सर्वात रंगतदार सामना ज्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो भारत - पाकिस्तान सामना आज होणार आहे

India-Pakistan face-off today in Asia Cup T20 | आशिया कप टी-20मध्ये आज भारत - पाकिस्तान आमने सामने

आशिया कप टी-20मध्ये आज भारत - पाकिस्तान आमने सामने

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मीरपूर, दि. 27 - आशिया कप टी20 मधील सर्वात रंगतदार सामना ज्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो भारत - पाकिस्तान सामना आज होणार आहे. आशिया कप टी-20 च्या निमित्ताने भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ पुन्हा एकदा आमने सामने येत आहेत. पुढील महिन्यात सुरु होणा-या आयसीसी विश्व टी-20 चॅम्पिनयनशिपच्या पहिल्या फेरीत भारत-पाकिस्तान संघाची लढत होणार आहे. मात्र त्याआधीच आशिया कपच्या निमित्ताने भारत-पाकिस्तान संघापैकी नेमकं कोणाचं पारडं जड आहे हे पाहायला मिळणार आहे. 
 
* भारत - पाकिस्तान लढतींचा इतिहास
 
- टी-20 क्रमवारीत भारत पहिल्या, तर पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर आहे.
 
- भारत - पाकिस्तानदरम्यान टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यत 6 सामने झाले आहेत. यामध्ये भारताने 4, तर पाकिस्तानने 1 सामना जिंकला आहे. टाय झालेला एक सामना भारतीय संघाने बोल्डआउटमध्ये (सुपर ओव्हर) जिंकला आहे. 
- 2012-13 मध्ये भारतात दोन्ही संघामध्ये झालेल्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकून मालिका अनिर्णित राखली होती.
 
- वनडेमध्ये या दोन्ही संघांमध्ये 127 लढती झाल्या आहेत. यामध्ये भारताने 51, तर पाकिस्तानने 72 सामने जिंकले आहेत. चार सामन्यांचा निकाल लागू शकलेला नाही.
- भारताने टी-20 मध्ये आतापर्यंत एकूण 64 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 38 सामने जिंकले असून, 25मध्ये पराभव पत्करला आहे. एक सामना टाय राहिला.
 
- पाकिस्तान संघाने आतापर्यंत 98 सामने खेळले आहेत. यामधील 58 जिंकले असून 40 मध्ये पराभव झालेला आहे.

Web Title: India-Pakistan face-off today in Asia Cup T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.