पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद! सीमेपलीकडून येणाऱ्या 'मेड इन चायना' ड्रोनमुळे BSF चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:20 IST2025-03-13T21:19:33+5:302025-03-13T21:20:28+5:30

India Pakistan News: बहुतांश ड्रोन पाकिस्तानमधील लाहोरमधून आणि भारतातील अमृतसरमध्ये पाठवले जात आहेत.

India Pakistan News: Pakistan's drone terrorism! BSF concerned about 'Made in China' drones coming from across the border | पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद! सीमेपलीकडून येणाऱ्या 'मेड इन चायना' ड्रोनमुळे BSF चिंतेत

पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद! सीमेपलीकडून येणाऱ्या 'मेड इन चायना' ड्रोनमुळे BSF चिंतेत


India Pakistan News:पाकिस्तानातून भारतात ड्रोनद्वारे ड्रोन, शस्त्रे, दारुगोळा आणि इतर प्रतिबंधित वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व गोष्टी भारतीय सीमा सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) मोठे आव्हान बनले आहे. विशेष म्हणजे, बीएसएफने जप्त केलेले सर्व ड्रोन चीनमध्ये बनवलेले असल्याचे दिसून आले आहे. यातील बहुतांश ड्रोन पाकिस्तानच्या लाहोर जिल्ह्यातून आले असून, ते पंजाबमधील अमृतसरच्या दिशेने जात होते. गेल्या काही वर्षांत जमिनीवरुन होणारी तस्करी जवळपास संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची बहुतांश तस्करी होऊ लागली आहे.

या शहरांमधून ड्रोन पाठवले जाताहेत
जानेवारी 2025 मध्ये बीएसएफने 63 ड्रोन ताब्यात घेतले होते. तर, 2024 मध्ये बीएसएफने 260 ड्रोन जप्त करून ते तपासासाठी पाठवले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रोनमुळे सर्वाधिक प्रभावित राज्ये पंजाब आणि राजस्थान आहेत. पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, फिरोजपूर, अबोहर आणि राजस्थानमधील गंगानगर सर्वात जास्त प्रभावित आहे. पाकिस्तानातील लाहोर, नारोवाल आणि कसूर जिल्ह्यातून हे ड्रोन पाठवले जात आहेत.

बीएसएफने 2024 मध्ये सोडलेल्या ड्रोनच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, अमृतसर, गुरुदासपूर आणि फिरोजपूरसह सीमावर्ती भागात 260 ड्रोन माल टाकण्यासाठी आले होते. या ड्रोनचे लॉन्च पॅड पाकिस्तानी रेंजर्सच्या तळांजवळ असल्याचेही तपासात समोर आले आहे. 

ड्रोनचा सहज माग काढता येत नाही
गेल्या काही वर्षांत ड्रग्स, शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याची तस्करी करणारे ड्रोन हे पंजाबमधील सुरक्षेला मोठा धोका बनले आहेत. 2023 मध्ये बीएसएफने 110 ड्रोन जप्त केले, तर 2024 मध्ये 260 ड्रोन जप्त केले. पंजाबमध्ये सापडलेल्या 55 टक्के ड्रोन सुरक्षा दलांनी अक्षम केले आहेत. पाकिस्तानकडून पाठवल्या जाणाऱ्या ड्रोनची संख्या वाढण्याबरोबरच त्यांचा आकारही लहान झाला आहे. हे ड्रोन एक किलोमीटर उंचीपर्यंत उडतात आणि सहज पकडले जात नाहीत.

 

Web Title: India Pakistan News: Pakistan's drone terrorism! BSF concerned about 'Made in China' drones coming from across the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.