भारताच्या हवाई हद्दीतून इम्रान खानना उड्डाणाची परवानगी; श्रीलंका दौऱ्याचा अडथळा दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:39 PM2021-02-23T12:39:08+5:302021-02-23T12:43:45+5:30
India permits Imran Khan aircraft to use its airspace for travel to Sri Lanka : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी भारताकडून देण्यात आली आहे. इम्रान खान प्रथमच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, यावेळी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
नवी दिल्ली :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी भारताकडून देण्यात आली आहे. इम्रान खान प्रथमच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून, यावेळी त्यांचे विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करेल, अशी माहिती देण्यात आली आहे. (India permits Imran Khan aircraft to use its airspace for travel to Sri Lanka)
एका वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी भारतीय हवाई क्षेत्रातून त्यांचे विमान जाणार असल्याने त्यासाठी भारताकडून परवानगी देण्यात आली आहे. यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्या श्रीलंका दौऱ्यातील अडथळा दूर झाल्याचे सांगितले जात आहे.
India permits Imran Khan's aircraft to use its airspace for travel to Sri Lanka
— ANI Digital (@ani_digital) February 23, 2021
Read @ANI Story | https://t.co/tY099czifUpic.twitter.com/7w0YHlhEi9
दरम्यान, सन २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानने हवाई क्षेत्र वापरण्यासाठी परवानगी नाकारली होती. अमेरिका आणि सौदी अरेबिया दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार असताना पाकिस्तानने आडमुठेपणा करत हवाई क्षेत्र वापरण्यास मनाई केली होती. काश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचे उल्लंघन होत असल्याची सबब पाकिस्तानने दिली होती.
लाल किल्ला हिंसाचाराप्रकरणी आणखी दोघांना अटक; कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप
सामान्य परिस्थितीत व्हीव्हीआयपी विमानांना उड्डाणासाठी देशांकडून परवानगी दिली जाते. मात्र पाकिस्तानने परवानगी नाकारणे नियमाचे उल्लंघन असल्याचा आक्षेप घेत व्हीव्हीआयपी विमानाला परवानगी नाकारण्याचा मुद्दा भारताने आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडे उपस्थित केला होता.
तत्पूर्वी, जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून इम्रान खान वारंवार भारतावर टीका करत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताविरोधात पाकिस्तानकडून गरळ ओकणे सुरूच असते. भारताकडून बहुतांश वेळेस पाकिस्तानसमोर मैत्रीचा आणि सीमाभागात शांततेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र, दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानही भूमिका असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अलीकडेच इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौराही केला होता.