ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत

By कुणाल गवाणकर | Published: January 28, 2021 12:46 PM2021-01-28T12:46:23+5:302021-01-28T12:48:41+5:30

भारतीय लष्कराचे अधिकारी तिबेटचा अभ्यास करणार; प्रस्ताव तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात

india To Play Tibet Card With Study Of Tibetology In Confrontation With China | ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत

ड्रॅगनच्या दुखऱ्या जखमेवर बोट; भारतीय लष्कर चीनला धक्का देण्याच्या तयारीत

Next

नवी दिल्ली: गेल्या आठ महिन्यांपासून भारत आणि चीनचं सैन्य पूर्व लडाखमध्ये आमनेसामने उभं ठाकलं आहे. काही दिवसांपूर्वीच चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आगळीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर आता चीनकडून सुरू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. यासाठी भारतीय लष्करानं तिबेटचा इतिहास, तिथली संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती तयार केली आहे.

चीनचा घुसखोरीचा डाव भारताने उधळला; २० चिनी सैनिक जखमी, परिस्थिती नियंत्रणात

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूला असलेल्या तिबेटचा खोलात जाऊन अभ्यास करण्याच्या सूचना लष्करी अधिकाऱ्यांना दिल्या जाणार आहेत. याबद्दलच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप देण्याचं काम लष्कराकडून सुरू आहे. तिबेटचा अभ्यास करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम ऑक्टोबरमध्ये लष्कराच्या कमांडर्सच्या संमेलनात पुढे आला. आता लष्करप्रमुख मनोज नरवणेंच्या आदेशावरून शिमल्यातील आर्मी ट्रेनिंग कमांड (एआरटीआरएसी) प्रस्तावाच्या विश्लेषणावर काम करत आहे.

भारताविरोधात आता चीनच्या पाण्याखालून कुरघोड्या; समोर आला महत्त्वाचा पुरावा

एआरटीआरएसीनं तिबेटॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या सात संस्थांची माहिती मिळवली आहे. या ठिकाणी लष्करी अधिकाऱ्यांना शिक्षणासाठी पाठवलं जाऊ शकतं. एआरटीआरएसीनं निवड केलेल्या संस्थांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा बौद्ध अध्ययन विभाग, वाराणसीतील सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर हायर तिबेटियन स्टडीज, बिहारमधील नवीन नालंदा महाविहार, पश्चिम बंगालमधील विश्व भारती, बंगळुरुस्थित दलाई लामा इन्स्टिट्यूट फॉर हायर एज्युकेशन, गंगटोकमधील नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि अरुणाचल प्रदेशमधील दाहुंगस्थित सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन कल्चर स्टडीजचा समावेश आहे.

Web Title: india To Play Tibet Card With Study Of Tibetology In Confrontation With China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.