"भारत गरीब देश, आमचं अॅप श्रीमंत देशांसाठी"
By admin | Published: April 16, 2017 11:53 AM2017-04-16T11:53:56+5:302017-04-16T11:53:56+5:30
भारतात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत भारत इतर देशांना कडवी टक्कर देत असताना स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचा भारतात बिझनेस वाढवण्याचा विचार नाहीये.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - भारतात सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल मीडियाच्या बाबतीत भारत इतर देशांना कडवी टक्कर देत असताना स्नॅपचॅटचे सीईओ इवान स्पीगल यांचा भारतात बिझनेस वाढवण्याचा विचार नाहीये. भारत खूप गरीब देश आहे आणि आमचं अॅप केवळ श्रीमंत देशांसाठी बनवण्यात आलं आहे असं ते म्हणाले आहेत.
व्हरायटीमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, 2015 मध्ये "ग्रोथ ऑफ अॅप्स यूजर बेस इन" या विषयावरील चर्चेसाठी झालेल्या बैठकीत इवान स्पीगल यांनी हे वक्तव्य केलं होतं. या बैठकीत एका कर्मचा-याने भारतात आपल्या अॅपचा झपाट्याने प्रसार होत नाही याबाबत चिंता व्यक्त केली असता, त्या कर्मचा-याचं म्हणणं ऐकून न घेता स्पीगल म्हणाले, मी भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशात व्यापार वाढवू इच्छित नाही. आपलं अॅप हे फक्त श्रीमंतांसाठी आहे.
उल्लेखनिय बाब म्हणजे सध्या भारतात 40 लाखांपेक्षा स्नॅपचॅटचे युजर्स असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. इवान स्पीगल यांच्या या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. #boycottsnapchat आणि #uninstallsnapchat या हॅशटॅगचा वापर करून युजर्स स्नॅपचॅटचा विरोध करत आहेत.