इंडिया पोस्ट बँकेने गाठला पाच कोटींचा टप्पा; रचला नवा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 09:16 AM2022-01-20T09:16:07+5:302022-01-20T09:17:19+5:30
१ सप्टेंबर २०१८ रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा वापर करीत या डिजिटल बँकेने हा टप्पा गाठला.
मुंबई : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने तीन वर्षांत पाच कोटी ग्राहकसंख्येचा टप्पा ओलांडत नवा विक्रम रचला. त्यामुळे देशात सर्वात जलद विस्तारलेल्या बँकांच्या यादीत तिला स्थान मिळाले. १ सप्टेंबर २०१८ रोजी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची सुरुवात झाली. दूरसंचार मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाच्या व्याप्तीचा वापर करीत या डिजिटल बँकेने हा टप्पा गाठला.
असे आहेत खातेदार
महिलांच्या एकूण खात्यांपैकी ९८ टक्के खाती त्यांच्या घरी जाऊन उघडण्यात आली.
महिला खातेदार ४८%
पुरुष खातेदार ५२%
६८ टक्के महिलांना या माध्यमातून थेट हस्तांतरणाचे लाभ मिळत आहेत.
४१% खातेधारक १८ ते ३५ वयोगटातील
‘आयपीपीबी’ने १.३६ लाख पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ५ कोटी खाती उघडली. त्यात १.२० लाख खाती ग्रामीण भागात आहेत. तर टपाल कार्यालयाच्या २ लाख ८० हजार कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही वित्तीय साक्षरता मोहीम पूर्ण करण्यात आली.
कोरोनाकाळातही आम्ही ग्राहकांना अखंड बँकिंग सेवा पुरवल्या. बँकेने संपूर्णपणे कागदविरहित व्यवहार करत डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर केला. ग्रामीण क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रापासून वंचित असलेल्या नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यास आम्ही बँक कटिबद्ध आहोत.
- जे वेंकटरामू, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी