Afghan NSA meet : भारताकडून पाकिस्तानच्या NSA ला आमंत्रण, दिल्लीत 'या' विषयावर होणार चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 09:00 AM2021-10-17T09:00:14+5:302021-10-17T09:01:36+5:30

India proposes to host Afghan NSA meet in November : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ही बैठक दिल्लीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये 10 आणि 11 तारखा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

India proposes to host Afghan NSA meet in November; invites | Afghan NSA meet : भारताकडून पाकिस्तानच्या NSA ला आमंत्रण, दिल्लीत 'या' विषयावर होणार चर्चा!

Afghan NSA meet : भारताकडून पाकिस्तानच्या NSA ला आमंत्रण, दिल्लीत 'या' विषयावर होणार चर्चा!

Next

नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भारताने ( India)पुढील महिन्यात काही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या बैठकीसाठी भारताने पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारला (Pakistan NSA) सुद्धा आमंत्रण देखील पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पाकिस्तान व्यतिरिक्त रशिया, चीन सारख्या देशांनाही आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. (Pakistan NSA among invitees for India’s own conference on Afghanistan)

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ही बैठक दिल्लीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी नोव्हेंबरमध्ये 10 आणि 11 तारखा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या बैठकीत अफगाणिस्तानच्या सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा केली जाईल. ही बैठक भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यापूर्वी जूनमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ची एक बैठक ताजिकिस्तानमध्ये झाली होती. या दरम्यान भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ समोरासमोर आले होते. मात्र, या दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली नाही. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. 

एवढेच नव्हे तर पाकिस्तानमध्ये फोफावलेल्या लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांशी सामना करण्यासाठी अजित डोवाल यांनी अॅक्शन प्लॅन सुद्धा सादर केला होता. दरम्यान, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर भारत सतत सक्रिय आहे. अलीकडेच अफगाणिस्तान संदर्भात अजित डोवाल यांनी रशियन समकक्ष निकोलाई पेत्रुशेव यांच्यासोबत चर्चा केली होती. याआधीही अजित डोवाल यांनी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुवेलियन यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती.

Web Title: India proposes to host Afghan NSA meet in November; invites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.