सुरक्षित वीज पुरवठ्यात भारत ९० व्या स्थानी
By admin | Published: March 3, 2016 03:50 AM2016-03-03T03:50:53+5:302016-03-03T03:50:53+5:30
स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात १२६ देशांच्या यादीत भारताला ९० वा क्रमांक देण्यात आला आहे. जागतिक आर्थिक मंचने (डब्लू-ई-एफ) याबाबत तयार केलेल्या यादीत स्वीत्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे.
Next
जिनेव्हा/नवी दिल्ली : स्वस्त आणि टिकाऊ वीजपुरवठा करण्यात १२६ देशांच्या यादीत भारताला ९० वा क्रमांक देण्यात आला आहे. जागतिक आर्थिक मंचने (डब्लू-ई-एफ) याबाबत तयार केलेल्या यादीत स्वीत्झर्लंड प्रथम क्रमांकावर आहे.
‘ग्लोबल एनर्जी आर्किटेक्चर परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट’मध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यात १२६ देशांतील वीज पुरवठ्याचे आकलन करण्यात आले आहे. त्यात उचित मूल्य, पर्यावरण, कायम आणि सुरक्षित पुरवठा यांचा विचार करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.