दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

By Admin | Published: September 16, 2016 07:54 AM2016-09-16T07:54:34+5:302016-09-16T09:53:42+5:30

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे

India ranked fourth on the list of countries affected by terrorism | दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

दहशतवाद प्रभावित देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - दहशतवाद प्रभावित देशांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये भारताचादेखील समावेश आहे. 2015 मध्ये जगभरात एकूण 11,774 दहशतवादी हल्ले झाले असून यामध्ये 28,328 लोकांनी आपला जीव गमावला आहे, तर 35,320 लोक जखमी झाले आहेत. भारतामधील दहशतवादी हल्ल्यांचं प्रमाण 43 टक्के असून यापैकी 791 हल्ले नक्षलवाद्यांनी केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 289 भारतीयांनी आपला जीव गमावला आहे. भारत चौथ्या क्रमांकावर असून पहिल्या तीन क्रमांकावर अनुक्रमे इराक, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा क्रमांक आहे. 
 
जगभरात तालिबान, इसीस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांची दहशत आहे. त्यानंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो. 2015 मध्ये नक्षलवाद्यांनी 343 हल्ले केले असून यामध्ये 176 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तालिबानने 1,093 हल्ले केले असून 4,512 लोकांचा जीव घेतला. इसीसने 931 हल्ले केले असून यामध्ये तब्बल 6,050 लोकांनी आपला जीव गमावला. बोको हराम 491 दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असून 5,450 लोकांच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरले. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी संघटनादेखील पहिल्या पाचमध्ये असून 283 हल्ल्यांमध्ये 287 लोकांचा त्यांनी जीव घेतला. 
 
दहशतवादाशी सामना करण्यासाठी भारत पुर्णपणे प्रयत्न करत आहे. भारतातील चार राज्यांमध्ये अर्ध्याहून जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमध्ये 21 टक्के, मणिपूरमध्ये 12 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 11 टक्के, झारखंडमध्ये 10 टक्के दहशतवादी हल्ले झाले आहेत. छत्तीसगडमधील दहशतवादी हल्ल्यांचं मोठ्या प्रमाणात वाढलं असून 2014 मध्ये जिथे 76 हल्ले झाले होते तो आकडा 2014 मध्ये 167 वर पोहोचला आहे. 
 
भारत चौथ्या क्रमांकावर असणे ही काळजीची गोष्ट असली तरी अनेक दहशतवादी हल्ले प्राणघातक नव्हते. त्यांची प्राणघातक क्षमता कमी होती. तसंच भारताकडून दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या उत्तरात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे. 2015 मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा आकडा दुप्पट झाला आहे. 2014 मध्ये 7 टक्के दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं होतं, पण 2015 मध्ये हा आकडा 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. जगभरात एकूण 6,924 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
 

Web Title: India ranked fourth on the list of countries affected by terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.