दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारत तिस-या क्रमांकावर - यूएस रिपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 08:51 AM2017-07-23T08:51:43+5:302017-07-23T08:51:43+5:30

2016 मध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणा-या देशांच्या यादीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे.

India ranked third in the list of terrorists - US report | दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारत तिस-या क्रमांकावर - यूएस रिपोर्ट

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारत तिस-या क्रमांकावर - यूएस रिपोर्ट

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - 2016 मध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करणा-या देशांच्या यादीत भारताने पाकिस्तानला मागे टाकले आहे. युएस स्टेट डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात मरणा-यांची आणि जखमींची संख्या पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त आहे. 
युएस स्टेट डिपार्टमेंटद्वारे NCSTRT संस्थेने केलेल्या दहशतवाद्यांशी संबंधीत सर्वेक्षणानुसार सांगण्यात येते की, जगभरात इराक आणि अफगाणिस्तान या दोन देशानंतर सर्वाधिक दहशतवादी हल्ले भारतात झाले आहेत. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारत दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत तिस-या स्थानावर आहे. याआधी तिस-या स्थानावर पाकिस्तानचा नंबर होता.  
NCSTRT संस्थेने माहितीनुसार, 2016 मध्ये जगभरात जवळपास 11 हजार 72 दहशतवादी हल्ले घडविण्यात आले. यामध्ये भारतात 927 (16 टक्के) दहशतवादी हल्ले झाले. तर, 2015 मध्ये भारतात हीच संख्या 798 होती. त्यावेळी दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 500 च्या आसपास होती. तर 2016 मध्ये वाढ होऊन जखमींची संख्या 636 इतकी झाली. दुसरीकडे, या सर्वेक्षणानुसार, पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. पाकिस्तानमध्ये 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये दहशतवादी हल्ले 27 टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 2015 मध्ये पाकिस्तानमध्ये 1010 दहशतवादी हल्ले झाले होते, तर 2016 मध्ये 734 हल्ले झाल्याची नोंद आहे. 
विशेष म्हणजे, या सर्वेक्षणामध्ये जगभरातील सर्वाधिक घातक तिस-या क्रमांकाची संघटना म्हणून नक्षलवाद्यांना घोषित करण्यात आले आहे. तर, पहिल्या नंबरवर इसिस ही दहशतवादी संघटना असून दुस-या स्थानावर तालिबान संघटना आहे. नक्षलवाद्यांना बोको हराम या दहशतवादी संघटनेपेक्षा जास्त उपसंहारक असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी झालेल्या 334 दहशतवादी हल्ल्यांमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात होते.
2016 मध्ये भारतात जास्तीत जास्त दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, मणीपूर आणि झारखंडमध्ये झाले आहेत. 
गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 93 टक्कांनी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 54.81 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

Web Title: India ranked third in the list of terrorists - US report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.