लैंगिक समानतेत भारत जगात १३५ व्या स्थानी, आईसलँड सर्वाधिक समतावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 10:49 AM2022-07-14T10:49:54+5:302022-07-14T10:52:47+5:30
मागील वर्षातील आर्थिक भागीदारी व संधींच्या क्षेत्रांमध्ये भारताच पाच क्रमांकाने बढती झाली आहे.
नवी दिल्ली : भारत लैंगिक समानतेत जगामध्ये १३५ व्या स्थानावर आहे. तथापि, मागील वर्षातील आर्थिक भागीदारी व संधींच्या क्षेत्रांमध्ये भारताच पाच क्रमांकाने बढती झाली आहे, असे जागतिक आर्थिक मंचने (डब्लूईएफ) जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. डब्ल्यूईएफच्या जिनेव्हामध्ये सुरू असलेल्या वार्षिक लैंगिक समानता अहवाल २०२२ नुसार, आईसलँड जगात सर्वाधिक समतावादी देशाच्या रूपाने प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड व स्वीडनचा क्रमांक लागतो.
भारतातील लैंगिक समानतेचा क्रमांक मागील १६ वर्षांत सातव्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. परंतु विविध मापदंडांवरील सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या देशांत समाविष्ट आहे, असे अहवालात म्हटले आहे. मागीलवर्षी भारताने आर्थिक भागीदारी व संधी यावरील कामगिरीत सर्वाधिक महत्त्वपूर्ण व सकारात्मक बदल केले आहेत. परंतु पुरुष व महिलांची श्रम दल भागीदारी २०२१ पासून कमी झाली आहे.
भारतानंतर केवळ ११ देश
एकूण १४६ देशांच्या यादीत भारताच्या नंतर केवळ ११ देशच आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, कांगो, इराण व चाड यांचा या यादीत सर्वात शेवटच्या पाच देशांमध्ये समावेश आहे. कोरोनाने लैंगिक समानतेला एक पिढी मागे ढकलले आहे व यातून सावरण्याच्या कमजोर प्रयत्नामुळे जागतिक स्तरावर प्रभाव पडत आहे, असेही अहवालात म्हटले आहे.
कमाईत वाढ
महिला खासदार/आमदार, वरिष्ठ अधिकारी व व्यवस्थापकांची भागीदारी १४.६%नी वाढून १७.६% झाली. तांत्रिक श्रमिकांच्या रूपातील महिलांची भागीदारी २९.२% वाढून ३२.९% झाली. कमाईबाबत लैंगिक समानतेमध्ये सुधारणा झाली असली, तरी पुरुष व महिलांसाठीच्या मूल्यात कमी झाली आहे.
अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी
मागील ५० वर्षांत राष्ट्रप्रमुखांच्या रूपात महिलांची भागीदारीच्या वर्षांमध्ये घट झाल्यामुळे राजकीय सशक्तीकरणाच्या उपनिर्देशांकात घट झाली. तथापि, भारत यात ४८ व्या स्थानावर आहे व अपेक्षेपेक्षा ही चांगली कामगिरी समजली जाते.