भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 07:38 AM2024-09-22T07:38:03+5:302024-09-22T07:38:28+5:30

सर्वाधिक तास काम करणाऱ्यांच्या यादीत भारत जगात दुसऱ्या स्थानी

India ranks second in the world in the list of people who work the most hours | भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात

भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात

नवी दिल्ली : इव्हाय इंडियाची तरुण कर्मचारी ॲना सॅबास्टियनचा मृत्यू कामाच्या अतिरिक्त ताणामुळे नुकतेच उघडकीस आले. त्यामुळे कामाचे तास आणि वरिष्ठांकडून होणारा छळ हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले. अशात भारतात काम करणाऱ्या चाकरमान्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असून सर्वाधिक तास काम करणाऱ्यांच्या यादीत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे, हे वास्तव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या (आयएलओ) ताज्या अहवालातून समोर आले आहे.

कामाचे तास व खासगी आयुष्य यात योग्य समतोल साधण्यासाठी भारतात आणखी प्रयत्नांची गरज आहे, असे आयएलओने म्हटले आहे. 

४६.७ इतके तास भारतीय कर्मचारी एका आठवड्यात काम करतात तर वनातू या देशातील कर्मचारी आठवड्यातून २४.७ तास काम करतात.

५८ टक्के कर्मचारी थकलेले-भागलेले

उद्योगांची संघटना फिक्की आणि बीसीजी यांनी आपल्या अहवालात म्हटले होते की, ५८ टक्क्यांपेक्षा अधिक भारतीय कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी थकवा आल्यासारखे वाटते.

थकवा येण्यामागे अतिरिक्त काम हे कारण नसून सतत होणाऱ्या बैठका आणि चर्चा हे आहे. थकवा आल्याने नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

कामाच्या ठिकाणी थकवा आल्यासारखे वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण जगभरात सरासरी ४८ टक्के इतके आहे. 

भारतासह दक्षिण आशियातील इतर देशांमध्येही कर्मचाऱ्यांची स्थिती चांगली नाही, असे यात म्हटले आहे. 

४९ तासांपेक्षा अधिक काम करणाऱ्यांचे प्रमाण? 
भूतान    ६१% 
भारत    ५१% 
बांगलादेश    ४७% 
पाकिस्तान    ४०% 
यूएई    ३९% 
म्यानमार    ३८% 

सर्वांत कमी काम कुठे?

देश    आठवड्याचे सरासरी तास 
वनातू    २४.७ 
किरिबाती    २७.३ 
नेंदरलँड्स    ३१.६ 
नॉर्वे    ३३.७ 
जर्मनी    ३४.२ 
जपान    ३६.६ 

एका आठवड्यात कुठे किती तास काम? 
देश    आठवड्याचे सरासरी तास 

भूतान    ५४.४ 
यूएई        ५०.९ 
लेसोथो    ५०.४ 
काँगो        ४८.६ 
कतार    ४८.० 
भारत        ४६.७ 
पाकिस्तान    ४६.९ 
बांगलादेश    ४६.५ 
चीन        ४६.१ 
सिंगापूर    ४२.६ 
 

Web Title: India ranks second in the world in the list of people who work the most hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.