रक्षणासाठी भारत सज्ज, दहशतवादाला विरोध करायलाच हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 05:35 AM2020-11-18T05:35:37+5:302020-11-18T05:40:05+5:30
चीन, पाकिस्तानवर मोदींचे टीकास्त्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांचा कडाडून विराेध करायला हवा असे सांगतानाच चीनच्या विस्तारवादी धाेरणांचा माेदींनी खरपूस समाचार घेतला. स्वत:च्या सार्वभाैमत्वाच्या रक्षणासाठी भारत सक्षम असल्याचा सज्जड दमही माेदींनी चीनला अप्रत्यक्षरित्या दिला. ब्रिक्स देशांच्या व्हर्च्युअल शिखर संमेलनात ते बाेलत हाेते.
या परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझिलचे राष्ट्रपती जेर बाेल्साेनाराे हे सहभागी झाले हाेते. माेदी यांनी दहशतवाद आणि सीमाप्रश्नावरुन प्रत्यक्ष नाव न घेता पाकिस्तान आणि चीनवर टीकास्त्र साेडले. चीनच्या विस्तारवादी धाेरणांवर माेदींवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. स्वत:च्या देशात सुविधा उपलब्ध करुन देतानाच इतरांच्या सार्वभाैमत्वाचा आणि सीमांचा आदर राखावा, असा टाेला माेदींनी हाणला.
दहशतवाद हे जगापुढे माेठे आव्हान आहे. दशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांविराेधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचेही सांगतानाच माेदींनी पुतीन यांच्या कामाचे काैतुक केले.
ब्रिक्सचे हे माेठे यश असून भारत हे कार्य आणखी जाेमाने पुढे नेईल. काेराेना महामारीच्या काळात ‘ब्रिक्स’चे याेगदान माेठे असल्याचे सांगतानाच स्थिरतेसाठी ‘ब्रिक्स‘ची भूमिका महत्त्वाची असल्याचे माेदींनी सांगितले.