भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार - राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 02:22 AM2020-09-16T02:22:43+5:302020-09-16T06:32:38+5:30
भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. चीनवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर ते म्हणाले, परिस्थिती पाहता यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. राजनाथ सिंह यांनी हे मान्य केले की, चीनने मोठ्या संख्येत लष्कर तैनात करून कराराचे उल्लंघन केले आहे.
भारतीय लष्कराची प्रशंसा करून सिंह म्हणाले की, चिनी कारवाईला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले व त्यात चीनचे मोठे नुकसान झाले. राजनाथ सिंह हे सांगत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात उपस्थित नव्हते.
राजनाथ यांच्या निवेदनावर काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांना बोलण्याची परवानगी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे सदस्य विरोध दाखवून सभागृहातून निघून गेले. सभागृहाबाहेर अधीर रंजन यांनी आरोप केला की, सरकार विरोधकांचा आवाज ऐकत नाही कारण त्याला भीती आहे की, जे खोटे बोलले जात आहे ते उघडे पडेल. सरकार चर्चेपासून पळ काढत आहे, ते लडाखवर चर्चा करू इच्छित नाही.
राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर लगेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘संरक्षणमंत्र्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसते की, मोदी यांनी देशाची चिनी अतिक्रमणावर दिशाभूल केली, देश लष्करासोबत उभा राहील. परंतु, मोदीजी तुम्ही कधी चीनविरुद्ध उभे राहाल? चीनकडून आमच्या देशाची जमीन केव्हा परत घेणार, चीनचे नाव घ्यायला घाबरू नका.’
सरकारच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने आरोप केला की, मोदी आणि त्यांचे सरकार संसदेत व बाहेर चिनी घुसखोरीवरून खोटे बोलत आहे.