भारतीयांनी चीनला दाखविले ‘दिवे’; आता ४० टक्के लायटिंग स्वदेशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:38 AM2022-10-18T07:38:12+5:302022-10-18T07:40:52+5:30

१ हजार कोटी रुपयांच्या या बाजारावर अनेक वर्षांपासून चीनचा जवळपास १०० टक्के ताबा होता.

india reduced export of diwali lighting from chine by 40 percent | भारतीयांनी चीनला दाखविले ‘दिवे’; आता ४० टक्के लायटिंग स्वदेशी

भारतीयांनी चीनला दाखविले ‘दिवे’; आता ४० टक्के लायटिंग स्वदेशी

googlenewsNext

नवी दिल्ली : दिवाळी तोंडावर आलेली असल्यामुळे देशातील लायटिंग मार्केट सजले आहे. १ हजार कोटी रुपयांच्या या बाजारावर अनेक वर्षांपासून चीनचा जवळपास १०० टक्के ताबा होता. मात्र, चीनच्या मक्तेदारीला काही मोठ्या प्रमाणात मोडण्यात यश आले आहे. गलवान संघर्षानंतर ग्राहकांनी मेड इन इंडिया लायटिंगला पसंती दिली. त्यामुळे आता ३० ते ४० टक्के स्वदेशी लायटिंगची विक्री होत आहे. 

यंदा डिझायनर (जॉय) लायटिंगची मागणी अधिक आहे. ओरिएंट इलेक्ट्रिकचे ईव्हीपी पुनित धवन यांनी सांगितले की, दिवाळीत जॉय लायटिंगचा व्यवसाय ८० ते १०० कोटी रुपयांचा होतो. यंदा स्वदेशी कंपन्यांनी दिवे, गणपती, स्वस्तिक इत्यादी डिझाइन बाजारात आणले आहेत. ५० हजार डीलर्स या व्यवसायात आहेत.

२३००० कोटींचा व्यवसाय
‘इलेक्ट्रिक लॅम्प अँड कंपोनेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, देशात एलईडीचा व्यवसाय २३ हजार कोटी रुपयांचा आहे. त्यात कंझ्युमर लायटिंगची हिस्सेदारी ६० टक्के आहे.

मोबाइल, लॅपटॉप नियंत्रित लायटिंग
यंदा रंग बदलणारी व डीम होणारी लायटिंग तर बाजारात आहेच, पण रिमोट कंट्रोल तसेच मोबाइल व लॅपटॉपवरून नियंत्रित होणारी लायटिंगही आहे. या लायटिंगची जुळणी देशातच केली जात आहे. मागील ५ वर्षांपासून वीज वाचविणारी लायटिंग उपलब्ध आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होत आहे.

एलईडी निर्मिती बाहेर, जुळणी देशात

  • ९२% हिस्सेदारी भारतातील एकूण दिव्यांच्या झालरींत अर्थात लायटिंगमध्ये एलईडीची आहे. मात्र, या लायटिंगची निर्मिती भारतात फारच कमी प्रमाणात होते. 
  • ६५% एलईडीचे सुटे भाग चीन आणि इतर देशांतून येतात. ओरिएंट इलेक्ट्रिकचे अतुल जैन यांनी सांगितले की, पीएलआय योजनेनंतर लायटिंग उत्पादकांचा उत्साह दुणावला आहे. 

Web Title: india reduced export of diwali lighting from chine by 40 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.