दिलासादायक! गेल्या २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांत घट; बरे होण्याचे प्रमाण ९६.४२ टक्के
By देवेश फडके | Published: January 11, 2021 01:04 PM2021-01-11T13:04:01+5:302021-01-11T13:06:00+5:30
कोरोना संकट अद्याप नियंत्रणात आले नसले, तरी गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (सोमवारी) माहिती दिली.
नवी दिल्ली : कोरोना संकट अद्याप नियंत्रणात आले नसले, तरी गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात १६ हजार ३११ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (सोमवारी) माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १६१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन आकडेवारीनंतर, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ०४ लाख ६६ हजार ५९५ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार १६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६.४२ टक्के तर कोरोनाचा मृत्युदर १.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
India reports 16,311 new COVID-19 cases, 19,299 discharges, and 161 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry
— ANI (@ANI) January 11, 2021
Total cases: 1,04,66,595
Active cases: 2,22,526
Total discharges: 1,00,92,909
Death toll: 1,51,160 pic.twitter.com/K2V2o58d6s
गेल्या २४ तासांत १९ हजार २९९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ कोटी ९२ हजार ९०९ वर पोहोचली आहे. तर, आताच्या घडीला देशात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २२ हजार ५२६ आहे. सलग २० व्या दिवशी उपचाराधीन रुग्णांची संख्या तीन लाखांहून कमी राहिली आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आल्यानंतर आता संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारीवर्गाला कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर ५० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.