CoronaVirus News : थोडासा दिलासा; गेल्या २४ तासांत ३,६६,१६१ कोरोनाचे नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:33 AM2021-05-10T10:33:46+5:302021-05-10T10:38:10+5:30

CoronaVirus News : देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली असून, त्यातील १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ जण बरे झाले.

India reports 3,66,161 new COVID -19 cases, 3,53,818 discharges and 3,754 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry | CoronaVirus News : थोडासा दिलासा; गेल्या २४ तासांत ३,६६,१६१ कोरोनाचे नवे रुग्ण

CoronaVirus News : थोडासा दिलासा; गेल्या २४ तासांत ३,६६,१६१ कोरोनाचे नवे रुग्ण

Next
ठळक मुद्देकोरोना रुग्ण वाढीचा आकडा इतर दिवसाच्या तुलनेत कमी असल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६६ हजार १६१ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३७५४ जणांचा मृत्यू झाला. तसेच, ३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण वाढीचा आकडा इतर दिवसाच्या तुलनेत कमी असल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. (India reports 3,66,161 new COVID -19 cases, 3,53,818 discharges and 3,754 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली असून, त्यातील १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख ४६ हजार ११६ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३७ लाख ४५ हजार २३७ इतकी आहे.  


गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांना प्राण गमावावे लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

(CoronaVirus News : दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा विस्फोट, ८० डॉक्टर पॉझिटिव्ह!)

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १४ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. तर  अनेक देशांमधील परिस्थिती  कोरोनामुळे गंभीर झाली आहे. 

(Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...)

दरम्यान, राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: India reports 3,66,161 new COVID -19 cases, 3,53,818 discharges and 3,754 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.