Coronavirus: दिलासा! देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त; ५५ लाख नागरिकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 10:37 AM2021-08-08T10:37:20+5:302021-08-08T10:40:06+5:30

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

india reports 39 070 new corona cases and 491 deaths in last 24 hours | Coronavirus: दिलासा! देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त; ५५ लाख नागरिकांचे लसीकरण

Coronavirus: दिलासा! देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त; ५५ लाख नागरिकांचे लसीकरण

Next
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशात एकूण ३९ हजार ०७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंदगेल्या २४ तासांत देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्तआतापर्यंत एकूण ५० कोटी ६८ लाख १० हजार ४९२ नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली: देशवासीयांसाठी काहीसे दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, गेल्या २४ तासांत देशात एकूण ३९ हजार ०७० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (india reports 39 070 new corona cases and 491 deaths in last 24 hours) 

गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या

केंद्रीय मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३९ हजार ०७० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ४९१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ४ लाख २७ हजार ८६२ झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत ४३ हजार ९१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत एकूण ०३ कोटी १० लाख ९९ हजार ७७१ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४ लाख ०६ हजार ८२२ इतकी आहे. गेल्या २४ तासांत ५५ लाख ९१ हजार ६५७ नागरिकांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ५० कोटी ६८ लाख १० हजार ४९२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

“मोदी सरकारला भाजप विचारसरणीचे न्यायाधीश हवेत, म्हणून ७ वर्षांपासून पदे रिक्त”

महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात ६ हजार ६१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून, ९ हजार ३५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात एकूण ६१ लाख ३९ हजार ४९३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७२ टक्के एवढे झाले आहे. तर, मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. 

“...म्हणूनच भाजप राहुल गांधींना घाबरते”; काँग्रेसची PM मोदींवर टीका

दरम्यान, मुंबईत ३३१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तर ४७३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आहे ७ लाख १४ हजार ६३९ इतका झाला आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. सध्या मुंबईत ४ हजार १९६ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर १ हजार ६४२ दिवसांवर पोहोचला आहे. 
 

Web Title: india reports 39 070 new corona cases and 491 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.