जगभरात इंधनासाठी मारामारी, पण भारताला रशियाच्या मैत्रीचा मोठ फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 04:59 PM2023-02-19T16:59:33+5:302023-02-19T17:00:03+5:30

अमेरिकेचा दबाव झुगारुन भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी सुरू ठेवली आहे.

India-Russia : Fights for Crude oil around the world, but India benefits greatly from Russia's friendship | जगभरात इंधनासाठी मारामारी, पण भारताला रशियाच्या मैत्रीचा मोठ फायदा

जगभरात इंधनासाठी मारामारी, पण भारताला रशियाच्या मैत्रीचा मोठ फायदा

googlenewsNext

India-Russia : सध्या जगभरातील देशांना इंधनासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. रशियाकडून तेल घेऊ नये, यासाठी अमेरिका आधीच दबाव आणत आहे. युरोपसह इतर अनेक देश अमेरिकेच्या दबावाला बळी पडत आहेत. पण या दबावातही भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे आपल्याला स्वस्त तेल मिळत आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताने रशियाकडून सर्वाधिक तेल आयात केले आहे.

रशियन मीडियानुसार, पाश्चात्य देशांनी रशियन तेलावर विविध निर्बंध लादले होते, त्यामुळे भारताने मोठ्या सवलतीत तेल आयात केले. आकडेवारी दर्शवते की, रशिया आयातीच्या बाबतीत भारताचा चौथा सर्वात मोठा भागीदार बनला आहे. भारताने 37.31 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आयात केली आहे. ही वार्षिक 384 टक्के वाढ आहे.

भारताकडून निर्यात होणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 10 महिन्यांच्या आर्थिक कालावधीत भारताची निर्यात $78.58 अब्ज होती. गेल्या वर्षी ते 50.77 अब्ज डॉलर होती. तेल आयातीच्या बाबतीत भारत सरकारने अशी मुत्सद्देगिरी स्वीकारली आहे, ज्यामुळे संकटकाळातही भारतीयांना स्वस्त इंधन मिळत आहे. विशेष म्हणजे, तेल आयातीच्या बाबतीत भारत हा तिसरा सर्वात मोठा देश आहे.

अमेरिकेसमोर भारत वरचड
रशियन तेलाच्या आयातीला अमेरिका विरोध करत होती, पण काही दिवसांपूर्वी भारतावर कोणतेही निर्बंध लादणार नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील सहायक सचिव (युरोपियन आणि युरेशियन व्यवहार) कॅरेन डॉनफ्रीड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही भारतावर कोणतेही निर्बंध लादणार नाही. भारतासोबतचे आमचे संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत. युक्रेनला त्याच्या बाजूने मानवतावादी मदत देण्यात आल्याच्या भारताच्या पावलाचेही आम्ही स्वागत करतो. भारताने ज्या प्रकारे रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचे आवाहन केले, त्या विधानाचेही स्वागत करायला हवे. 

Web Title: India-Russia : Fights for Crude oil around the world, but India benefits greatly from Russia's friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.