India-Russia Summit: जग बदलले तरी रशियासोबत मैत्री तशीच राहिली; नरेंद्र मोदींनी केले पुतीन यांचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 09:24 PM2021-12-06T21:24:07+5:302021-12-06T21:25:00+5:30
Narendra Modi-Vladimir Putin meet: दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे स्वागत केले.
दिल्लीच्या हैदराबाद हाऊसमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचे स्वागत केले. यावेळी मोदी यांनी म्हटले की दोन्ही देशांमध्ये संबंध मजबूत झाले आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत रशियाची मदत मिळाली. संरक्षण क्षेत्रातही आधीपासूनच सहकार्य आहे, रणनितीक सहकार्य मजबूत होत आहे.
मोदी म्हणाले की, गेल्या काही दशकांत जगभरात मोठे बदल झाले आहेत. अनेक प्रकारचे भू-राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. मात्र, भारत आणि रशियाची मैत्री कायम राहिली आहे. दोघांमधील आंतरदेशीय मैत्रीचे हे अनोखे आणि विश्वसनिय मॉडेल आहे.
पुतीन म्हणाले की, आम्ही भारताकडे एक महान ताकद, एक मित्र राष्ट्र आणि वेळेच्या कसोटीवर मदतीसाठी धावून येणाऱ्या मित्राच्या रुपात पाहतो. दोन्ही देशांमधील संबंध दृढ होत चालले आहे आणि मी भविष्याकडे पाहत आहे. गुंतवणूक जवळपास 38 अब्जांवर पोहोचली आहे. आम्ही सैन्य आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप सहकार्य करतो, असे अन्य कोणतेही देश करत नाहीत.
Currently, mutual investments stand at about 38 billion with a bit more investment coming from the Russian side. We cooperate greatly in military & technical sphere like no other country. We develop high technologies together as well as produce in India: Russian President pic.twitter.com/04PerL7U8T
— ANI (@ANI) December 6, 2021
दहशतवादाशी संबंधीत सर्व गोष्टींवर आम्हाला चिंता वाटते. अंमली पदार्थांची तस्करी आणि संघटीत गुन्हेगारीविरोधातील लढाई ही देखील दहशतवादाविरोधातील लढाई आहे. आम्ही अफगाणिस्तानची परिस्थिती आणि तेथील बदलती परिस्थतीवर चितेत आहोत, असे पुतीन म्हणाले. भारतीय अंतराळ वीरांना रशिया प्रशिक्षण देणार आहे. आज जी चर्चा झाली त्यावर अंलम केला जाईल, असा विश्वास पुतीन यांनी दिला.