चीन सीमेवर भारत 54 चौक्या उभारणार
By admin | Published: June 11, 2014 01:02 AM2014-06-11T01:02:22+5:302014-06-11T01:02:22+5:30
चीन सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे पाऊल उचलताना भारताने 54 नवीन चौक्या उभारण्याची योजना आखली आहे.
Next
>नवी दिल्ली : चीन सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे पाऊल उचलताना भारताने 54 नवीन चौक्या उभारण्याची योजना आखली आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी) अरुणाचल प्रदेशात चीन सीमेलगत या अत्याधुनिक चौक्या उभारणार आहे.
आयटीबीपीने 54 चौक्यांचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव गृहमंत्रलयाच्या विचाराधीन असल्याचे अधिकृत सूत्रंनी सांगितले.
गृहमंत्रलयाने या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे, असे सूत्रंनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशला लागून चीनची सीमा आहे. या आंतरराष्ट्रीय सीमेचे अंतर 1,126 किमी आहे. जम्मू-काश्मीरला लागून पाकिस्तान सीमेचे अंतर 1,597 किमी आहे.
सीमेवरील भारताच्या सुरक्षा यंत्रणांचे अत्याधुनिकरण आणि योग्य सीमा व्यवस्थापन योजनेचा एक भाग म्हणून घुसखोरी होणा:या भागात चौक्याचे अत्याधुनिकरण करण्याचा प्रस्ताव आहे.
नवीन सीमा चौक्यांवर सौर ऊर्जा पुरविण्यात येईल. या चौक्यांवर नियमित आयटीबीपी जवानांसह आपत्कालीन स्थितीत अतिरिक्त कुमुक पाठवण्याची वेळ आल्यास या पथकाची व्यवस्था तेथे होऊ शकेल. या चौक्यांवर सॅटेलाईट फोनची सुविधा राहणार आहे, असे सूत्रंनी सांगितले.
सध्या 3,488 किमी अंतर सीमेवर भारताच्या 142 चौक्या आहेत. यामध्ये हिमाचल प्रदेश (2क्क् किमी), उत्तराखंड (345 किमी) आणि सिक्कीम (22क् किमी) यांचा समावेश आहे. सध्या अरुणाचल प्रदेशात जवळपास 3क् चौक्या असून, आणखी चौक्यांची आवश्यकता आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)